IIT-Hyderabad : बार्सिलोनामध्ये लाँच झालं नवीन वायरलेस 5G तंत्रज्ञान; हैदराबादमध्ये झालीय निर्मिती

Wireless 5G Tech : हे तंत्रज्ञान ओपन रेडिओ अ‍ॅक्सेस नेटवर्कवर आधारित आहे. जागतिक स्तरावरील वायरलेस ऑपरेटर्सची क्षमता वाढवण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो.
IIT-Hyderabad 5G tech
IIT-Hyderabad 5G techeSakal

Indian Wireless 5G Technology : भारतामध्ये तयार झालेलं नवीन 5G तंत्रज्ञान आता जागतिक स्तरावर पोहोचलं आहे. बार्सिलोनामध्ये ORAN ही वायरलेस टेक्नॉलॉजी लाँच करण्यात आली. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान IIT हैदराबादच्या WiSig नेटवर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपने तयार केलं आहे. यासाठी प्रोग्रामेबल सोल्यूशन्स ग्रुपची देखील मदत घेण्यात आली. (Tech News)

हे तंत्रज्ञान ओपन रेडिओ अ‍ॅक्सेस नेटवर्कवर आधारित आहे. जागतिक स्तरावरील वायरलेस ऑपरेटर्सची क्षमता वाढवण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो. यामुळे सिग्नल क्वालिटी आणि स्पेक्ट्रल एफिशिअन्सी देखील अधिक चांगली होणार आहे. (IIT Hyderabad Technology)

कसा होईल वापर?

"5G टेक्नॉलॉजी ही 4Gच्या तुलनेत तीन पटींनी अधिक एफिशियंट आहे. एखादा टेलिकॉम ऑपरेटर जर सध्या 100 यूजर्सना सेवा पुरवत असेल, तर या तंत्रज्ञानाच्या मदतीने तो 300 यूजर्सना तेवढ्याच आरामात सेवा पुरवू शकेल", अशी माहिती WiSig नेटवर्क्सचे संस्थापक किरण कुमार यांनी दिली. टाईम्सने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

IIT-Hyderabad 5G tech
Tecno Robot Dog at MWC : टेक्नोने सादर केला चक्क रोबोट डॉग.. सोबतच लाँच केले स्मार्टफोन अन् 'गेमिंग एआर'; पाहा व्हिडिओ

ORAN टेक्नोलॉजीचंच हे अ‍ॅडव्हान्स रुप आहे. तसंच, अशा प्रकारचं हे पहिलंच संशोधन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. टेलिकॉम कंपन्या आपल्या यूजर्सना अधिक चांगला स्पीड आणि क्वालिटी देऊ शकणार आहेत. तसंच अधिक रेंजमधील यूजर्सना सेवा पुरवता येणार आहे, असंही कंपनीने म्हटलं आहे.

बीएसएनएल करणार वापर

आम्ही जागतिक टेलिकॉम कंपन्यांसोबत या टेक्नॉलॉजीचा वापर करण्याबाबत बोलणी करत आहोत. भारतात BSNL या टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. टेलिकॉम विभागाच्या सी-डॉट (सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स) या विभागासोबत देखील आम्ही काम करत आहोत. 5G Open-RAN तंत्रज्ञान डेव्हलप झाल्यानंतर ते BSNL आणि प्रायव्हेट नेटवर्क्ससाठी उपलब्ध होईल, असं IIT हैदराबादमधील एका प्राध्यापकांनी सांगितलं.

IIT-Hyderabad 5G tech
Tata Semiconductor Plant : भारतात सेमीकंडक्टर तयार करण्यासाठी 'टाटा'ला ग्रीन सिग्नल; गुजरातमध्ये उभारणार पहिला प्लांट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com