इन्स्टाग्रामचं नवं फीचर, Reels मधून असे तयार करा TikTok सारखे व्हिडिओ

instagram reels feature
instagram reels feature

नवी दिल्ली - भारत चीन संघर्षानंतर भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर इन्स्टाग्रमाने Reels या नव्या फीचरची चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. टिकटॉक प्रमाणे यावर 15 सेकंदाचे व्हिडिओ तयार करता येत आहेत. भारतात या फीचरचा वापर आजपासून करता येणार आहे. या फीचरबाबत भारतातील काही युजर्सनी म्हटलं आहे की, त्यांना हे फीचर मिळालं आहे. हे नवं फीचर अशा वेळी आलं आहे जेव्हा भारताने टिकटॉक बॅन केलं आहे. भारत सरकारने गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरवरील 59 अॅप्स हटवली आहेत.

इन्स्टाग्रामने गेल्या वर्षी Reels चं टेस्टिंग ब्राझिलमध्ये सुरु केलं होतं. नुकतंच हे फीचर फ्रान्स आणि जर्मनीमध्ये लाँच केलं. फेसबुक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी  इन्स्टाग्रामचं हे फीचर येण्याच्या मार्गावर असल्याचं सांगितलं होतं. 

इन्स्टाग्राम या फीचरकडे क्रिएटर्ससाठी एक संधी म्हणून बघत आहे. ज्यापद्धतीनं टिकटॉकने युजर्सना एक प्लॅटफॉर्म दिला होता. यामध्ये एवढाच फरक आहे की, इन्स्टाग्राम आधीपासूनच क्रिएटर्ससोबत पार्टनरशिपमध्ये आहे आणि लाँच करताना सर्वात आधी Ammy Virk, Gippy Grewal, Komal Pandey आणि Arjun Kanungo यांसारख्या इन्फ्लुएन्सर्सच्या पेजच्या माध्यामातून दिसेल. Reels च्या माध्यमातून भारताला पुढचा सुपरस्टार मिळेल अशी आशा इन्स्टाग्रामकडून व्यक्त करण्यात आली आहे. 

इन्स्टाग्रामचे Reels टिकटॉक सारखंच आहे. फरक इतकाच आहे की हे स्टँडअलोन अॅप नाही. तर इन्स्टाग्रामचं एक फीचर आहे. Reels इन्स्टाग्रामच्या स्टोरीज सेक्शनमध्येही दिसणार आहे.  टिकटॉकप्रमाणेच यावरही युजरला 15 सेकंदाचा व्हिडिओ तयार करता येणार आहे. यामध्ये ऑडिओ किंवा म्युझिक ट्रॅक एडिट करता येईल. तसंच यात AR इफेक्टही वापरता येणार आहे. Reels मध्ये तयार करण्यात आलेले व्हिडिओ थेट इन्स्टाग्राम स्टोरी किंवा डायरेक्ट मेसेजवर शेअर करता येणार आहेत. 

इन्स्टाग्रामवर Reels कसे तयार करायचे
इन्स्टाग्राम ओपन केल्यानंतर पोस्ट करण्यासाठी असलेल्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर कॅमेरा ऑप्शन येतो. तो निवडल्यानंतर ऑडिओ ऑप्शनवर क्लिक करून गाणं किंवा संगीत इन्स्टाग्रामच्या म्युझिक लायब्ररीमधून सिलेक्ट करा. याशिवाय तुम्ही स्वत: ऑडिओ रेकॉर्ड करू शकता. त्यानंतर व्हिडिओ क्रिएट होतो. हा व्हिडिओ इन्स्टा स्टोरी आणि डायरेक्ट मेसेजला शेअर करता येतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com