Instagram New Feature : इन्स्टाग्राम लवकरच लाँच करणार, 'हे' नवीन फीचर

मेटा लवकरच इन्स्टाग्रामवर एक नवीन फीचर घेऊन येणार आहे.
Instagram New Feature
Instagram New Featureesakal

Instagram New Feature : व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सातत्याने नवनवीन फीचर्स येत असतात. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरील विविध फीचर्स हे नेहमीच युझर्सच्या दृष्टिकोनातून बनवले जातात. या तिन्ही प्लॅटफॉर्म्सची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटाकडून हे फीचर्स सादर केले जातात.

आता मेटा लवकरच इन्स्टाग्रामवर एक नवीन फिचर घेऊन येणार आहे. विशेष म्हणजे हे फिचर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आधीपासूनच आहे. हे फिचर लॉंच झाल्यानंतर, इन्स्टाग्रामवरील मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्याचा मेसेज वाचला की नाही ते कळणार नाही. हे फीचर कधी लॉंच होणार आहे? आणि या फीचर बद्दलची अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात.

Instagram New Feature
Instagram Reels : रिल्सच्या माध्यमातून ‘या’ पद्धतीने वाढवा व्यवसाय, जाणून घ्या 'या' सोप्या टिप्स

इन्स्टाग्रामच्या सीईओंनी केली घोषणा

इन्स्टाग्रामचे सीईओ अ‍ॅडम मोसेरी यांनी त्यांच्या ब्रॉडकास्ट चॅनेलवरील एका मेसेजमध्ये या नव्या फीचरची नुकतीच घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलयं की, कंपनी एका नव्या फीचरची चाचणी करत आहे. ज्यामुळे, युझर्सना त्यांना डायरेक्ट येणाऱ्या मेसेजेसमध्ये (DMs) रीड रिसिप्टचा पर्याय बंद करता येईल.

हे नवे फीचर कोणते ?

इन्स्टाग्रामच्या या नव्या फीचरचे नाव रीड रिसीप्ट असे असणार आहे. हे फीचर अगदी व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे असणार आहे. हे नवे फीचर इन्स्टाग्रामवरील युझर्सना येणाऱ्या डायरेक्ट मेसेजेसवर काम करणार आहे. इन्स्टाग्रामच्या या नव्या फीचरमुळे युझर्स त्यांचा रीड रिपोर्ट ऑफ देखील करू शकतात.

या रीड रिसीप्ट मेसेज द्वारे इन्स्टाग्राम युझर्सला पाठवण्यात आलेले मेसेजेस समोरच्या व्यक्तीला कळू न देता वाचले जाणार आहे. त्यामुळे, हे मेसेजेस वाचण्यात आले आहेत की नाही? हे समोरच्याला कळू शकणार नाही.

अशाच प्रकारचे फीचर व्हॉटस्अ‍ॅपमध्ये आधीच आहे. ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपचे रीड रिसीप्ट फिचर अ‍ॅक्टिव्हेट झाल्यावर मेसेज वाचूनही ब्लू टिक दिसत नाही.

कधी होणार लॉंच ?

इन्स्टाग्रामचे सीईओ मोसेरी यांनी अ‍ॅपचा स्क्रिनशॉट देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये हे फीचर दिसत आहे. या स्क्रिनशॉटवरून हे देखील कळून येतयं की, इन्स्टाग्राम त्यांचा मेन्यू देखील रिडिझाईन करत आहे. त्यामुळे, लवकरच आपल्याला इन्स्टाग्राममध्ये नवे बदल दिसून येण्याची शक्यता आहे.

अद्याप या फीचरच्या लॉंचची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, जेव्हा हे फीचर लॉंच होईल तेव्हा, युझर्स इन्स्टाग्रामच्या प्रायवसी सेटिंग्जमध्ये जाऊन या फीचरचा वापर करू शकतील.

Instagram New Feature
Instagram Features : कधीच विसरला जाणार नाही मित्रांचा वाढदिवस; इन्स्टाग्रामचे ‘हे’ नवे फिचर करून देणार आठवण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com