iPhone 15 : आयफोन-15 च्या 'प्रो' मॉडेलपेक्षा बेस मॉडेलच आहे अधिक 'व्हॅल्यू फॉर मनी'; जाणून घ्या का?

कित्येक ग्राहकांचा कल iPhone 15 Pro Max घेण्याकडे दिसून येतो आहे.
Apple iPhone 15 Base Model
Apple iPhone 15 Base ModeleSakal

काही दिवसांपूर्वीच अ‍ॅपल कंपनीने आपली आयफोन-15 सीरीज लाँच केली होती. यासाठी आता बुकिंग सुरू झालं असून, कित्येक ई-कॉमर्स वेबसाईट्सवर यासाठी ऑफर्स दिल्या जात आहेत. iPhone 15 चे चार मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत.

iPhone 15 च्या बेस मॉडेल्स आणि प्रो मॉडेल्सच्या किंमतीमध्ये भरपूर तफावत आहे. तसंच, प्रो मॉडेलमधील कित्येक फीचर्स बेस मॉडेलमध्येही उपलब्ध आहेत. तरीही कित्येक ग्राहकांचा कल iPhone 15 Pro Max घेण्याकडे दिसून येतो आहे. मात्र, नव्या आयफोनचं बेस मॉडेलच अधिक व्हॅल्यू फॉर मनी असल्याचं दिसून येत आहे. बऱ्याच गोष्टींमुळे असं म्हटलं जात आहे.

Apple iPhone 15 Base Model
iPhone 15 Discount : अमेझॉन, फ्लिपकार्ट, क्रोमा की विजय सेल्स? नव्या आयफोनवर कुठे मिळतोय सर्वात जास्त डिस्काउंट?

किंमत

iPhone 15 या बेस मॉडेलची किंमत 79,900 रुपयांपासून सुरू होते. तर, iPhone 15 Pro ची किंमत 1,34,900 रुपयांपासून होते. यामुळे आयफोन-15 हे मॉडेल अधिक परवडणारं आहे.

कॅमेरा

आयफोन-14 सीरीजमध्ये केवळ प्रो मॉडेल्सना 48 MP कॅमेरा दिला होता. मात्र, 15 सीरीजमध्ये बेस मॉडेलपासून टॉप मॉडेलपर्यंत सर्व व्हेरियंटना 48 मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. प्रो मॉडेलमध्ये कॅमेऱ्याचे अधिक चांगले फीचर्स आणि 5X झूम उपलब्ध आहे. मात्र, साधारण वापर करणाऱ्या कित्येकांना या फीचर्सची गरजही नसते.

Apple iPhone 15 Base Model
New iPhone : आयफोन 15 Pro घ्यावा की 14 Pro? दोन्हीमध्ये काय आहे फरक? जाणून घ्या

कलर ऑप्शन्स

iPhone 15 चा एक फायदा म्हणजे, यामध्ये तुम्हाला अनेक कलर ऑप्शन्स मिळतात. तर प्रो मॉडेल्समध्ये केवळ चार कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. यामुळे फोनचा रंग जर तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल, तर iPhone 15 बेस मॉडेलच तुमच्यासाठी योग्य ठरेल.

चार्जिंग स्पीड

अ‍ॅपलने आयफोन 15 सीरीजपासून यूएसबी-सी चार्जिंग पोर्ट देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, iPhone 15 च्या बेस आणि प्रो अशा सर्व मॉडेल्सना असाच चार्जिंग पोर्ट आहे. तसंच, बेस आणि प्रो मॉडेल्सचं चार्जिंग स्पीडही सारखंच आहे.

Apple iPhone 15 Base Model
iPhone 15 : इस्रोने बनवलंय 'आयफोन-15' मधील महत्त्वाचं फीचर! काय आहे कनेक्शन? जाणून घ्या

फास्ट डिलिव्हरी

अ‍ॅपल साधारणपणे 22 सप्टेंबरनंतर आयफोनची डिलिव्हरी सुरू करणार आहे. मात्र, कित्येक ठिकाणी प्रो मॉडेल्सची अपेक्षित डिलिव्हरी डेट ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पर्यंत गेली आहे. त्यामुळे बेस मॉडेल मागवणाऱ्या व्यक्तींना लवकर आपला फोन मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com