IRCTC News : रेल्वे प्रवासात WhatsApp वर मिळणार जेवण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

IRCTC News

IRCTC News : रेल्वे प्रवासात WhatsApp वर मिळणार जेवण

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात प्रवाशांच्या खाण्याचे हाल होतात. पण आता प्रवाशांना बसल्या जागी जेवण ऑर्डर करता येणार आहे. जीओ हाप्तिक टेक्नॉलजीज लिमिटेड (Jio Haptik Technologies Limited), WhatsApp चॅटबोट सोल्यूशन्स प्रोव्हायडर (WhatsApp chatbot solution provider), झूप (Zoop) यांनी IRCTC सोबत मिळून ही सुविधा सुरू केली आहे.

हेही वाचा: बेळगाव : २५ पासून तीन पॅसेंजर रेल्वे धावणार

हाप्तिकच्या प्रायोजकत्वाने WhatsApp वर आधारीत सेल्फ सर्विस फूड डिलिव्हरी (WhatsApp-based self-service food delivery platform) सुरू करण्यात आलं आहे. प्रवासी आपल्या पीएनआर PNR नंबर वरून ठरलेल्या रेल्वे स्टॉपच्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करू शकतात.

हेही वाचा: रेल्वे स्थानकांवर आणखी ५६८ सीसीटीव्ही कॅमेरे

Zoop's WhatsApp chatbot वरून असे करावे ऑर्डर

१) तुमच्या फोनमध्ये WhatsApp उघडा आणि Zoop ला +917042062070 या नंबर वर Hi चा मेसेज करा.

२) त्यानंतर तुम्हाला Zoop चा रिप्लाय येईल. त्यावर तुम्हाला ऑर्डर फूड, चेक PNR स्टेटस, ट्रॅक ऑरडर असे ऑप्शन्स येतील.

३) तुम्हाला जेवण मागवायचे असेल तर त्या ऑप्शनवर क्लिक करा.

हेही वाचा: आता सर्वच गाड्यांमध्ये ‘एचएचटी’ प्रवाशांच्या चांगल्या प्रतिसादाने रेल्वे बोर्डाचा निर्णय

४) त्यानंतर तुम्हाला तुमचा १० डिजीट PNR नंबर टाकावा लागेल.

५) त्यानंतर तुम्हाला तुमचा PNR आणि इतर डिटेल्ड्स विचारले जातील.

६) त्यानंतर तुम्हाला कोणत्या स्टेशनला जेवण हवे ते विचारले जाईल.

७) स्टेशन निवडल्यावर तुम्हला कोणत्या रेस्टॉरंटमधून जेवण मागवायचे आहे ते ऑप्शन्स मिळतील.

हेही वाचा: रेल्वे प्रशासन प्रवाशांचा डेटा विकून 1000 कोटी कमावण्याच्या तयारीत

८) नंतर काय हवे ते निवडावे.

९) त्यानंतर तुम्ही जे मागवले आहे ते एकत्र दाखवले जाते. त्यानंतर पेमेंट ऑप्शन दिसतो.

१०) पेमेंट ऑप्शन देऊन संपर्क क्रमांक दिल्यावर तुमची ऑर्डर प्लेस होते.

Web Title: Irctc News Through Whatsapp You Can Order Food In Railway Journey

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :railwaywhatsappfood news