पुन्हा रस्त्यावर दिसणार Lambretta स्कूटर्स, लॉंचबद्दल माहिती आली समोर

italian scooter brand lambretta to comeback indian market in 2023 to launch electric scooter in 2024
italian scooter brand lambretta to comeback indian market in 2023 to launch electric scooter in 2024

लोकप्रिय टू-व्हीलर ब्रँड लॅम्ब्रेटा 2023 मध्ये भारतात पुनरागमन करणार आहे. एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की कंपनी बर्ड ग्रुपच्या सहकार्याने वाहन बाजारात पुनरागमन करणार आहे. कंपनी भारतात 2023 मध्ये 200 आणि 350 cc मध्ये हाय पॉवर स्कूटर G, V आणि X मॉडेल्सची सीरीज सादर करेल याशिवाय कंपनी 2024 मध्ये इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

ET Auto शी बोलताना, Lambretta ब्रँडचे मालक आणि Innocenti SA चे बोर्ड सदस्य वॉल्टर शॅफेरहान म्हणाले की, भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी समूह पुढील 5 वर्षांत बर्ड ग्रुपसोबत $200 दशलक्षपेक्षा जास्त गुंतवणूक करेल.

नवीन स्कूटर्स हाय-एंड मॉडेल म्हणून आणल्या जातील. लॅम्ब्रेटाचा या भागीदारीत 51 टक्के हिस्सा असेल, तर उर्वरित 49% हिस्सा बर्ड ग्रुपने विकत घेतला आहे. कंपनी 2023 च्या सुरुवातीला CBU आणि SKD मॉडेल लॉन्च करेल. याशिवाय, कंपनी 2024 च्या पहिल्या तिमाहीपासून भारतात उत्पादन सुरू करण्याचा विचार करत आहे.

italian scooter brand lambretta to comeback indian market in 2023 to launch electric scooter in 2024
तुमच्या खिशाला परवडणारा Poco M5 स्मार्टफोन लॉंच; जाणून घ्या खासियत

इलेक्ट्रिक लॅम्ब्रेटा स्कूटर 2023 मध्ये मिलान मोटरसायकल शोमध्ये सादर केली जाईल आणि तेच मॉडेल भारतात स्थानिक पातळीवर बनवले जाऊ शकते. हा भारतातील सर्वात मोठा कारखाना असण्याची शक्यता असून कंपनी भारतातील या कारखान्याचा वापर निर्यातीसाठी करणार आहे. लॅम्ब्रेटा सध्या जवळपास 70 देशांमध्ये अस्तित्वात आहे आणि स्कूटर्स युरोप आणि आग्नेय आशियामध्ये तयार केल्या जातात.

italian scooter brand lambretta to comeback indian market in 2023 to launch electric scooter in 2024
Redmi A1 : रेडमीचा आणखी एक स्वस्त फोन येतोय ६ सप्टेंबरला, जाणून घ्या डिटेल्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com