Best Phones under 5000 | 5 हजारपेक्षा कमी किंमतीचा हा स्वस्त फोन तुम्हाला माहितेय का? फिचर्स पहाल तर शॉक व्हाल... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Itel A24 Pro Phones under 5000

Best Phones under 5000: 5 हजारपेक्षा कमी किंमतीचा हा स्वस्त फोन तुम्हाला माहितेय का? फिचर्स पहाल तर शॉक व्हाल...

Best Phones under 5000 : एंट्री-लेवल सेगमेंटमध्ये आणखी एक फोन लॉंच करण्यात आला. या फोनचं नाव Itel A24 Pro ठेवण्यात आलंय.

या फोनमध्ये छोटा डिस्प्ले, चंकी बेजल्स सोबत देण्यात आलाय. फोनच्या फ्रंट आणि रियरमध्ये सिंगल कॅमरा सेंसरसुद्धा देण्यात आलाय. या फोनमध्ये 4G कनेक्टिविटी असणार आहे तर चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Itel A24 Pro चे फीचर्स 

Itel A24 Pro मध्ये 5-इंचीची IPS LCD स्क्रीन दिली आहे. याचं रेजोलूशन 850 x 480 पिक्सल आहे. या फोन मध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलंय. शिवाय कंपनी सिक्योरिटी साठी यात अनलॉकचं सुद्धा फिचर देण्यात आलंय.

या एंट्री-लेवल फोन मध्ये Android 12 (Go edition) देण्यात आलंय. फोटोग्राफीचं बोलायचं तर यात रियरमध्ये 2-मेगापिक्सल कॅमरा LED फ्लॅश सोबत देण्यात आलाय तर फोनच्या फ्रंटमध्ये 0.3 मेगापिक्सलचा कॅमरा देण्यात आलाय. फोनचा पॉलीकॉर्बोनेट रियर ट्रेंडी डिझाइन सोबत येतो. 

हेही वाचा: iPhone Offer: आयफोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, ३० हजार रुपये स्वस्तात करा खरेदी; पाहा ऑफर

या फोनमध्ये 3,020mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरीला microUSB पोर्टनी चार्ज करावी. या फोनमध्ये क्वाड कोर 1.4GHz Unisoc SC9832E प्रोसेसर देण्यात आलाय. फोनचा रॅमविषयी कंपनीने कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही.

या फोन मध्ये 32GB ची इंटरनल मेमोरी देण्यात आली आहे. अॅडिशनल स्टोरेजसाठी एस्टर्नल स्टोरेज स्लॉट देण्यात आलाय. यामध्ये microSD कार्डच्या मदतीने स्टोरेजला 32GB पर्यंत वाढविला जाऊ शकतो. या फोनमध्ये मेजरमेंट 145.4 x 73.9 x 9.85mm आहे. 

हेही वाचा: I-Phone Price : किडनी विकून देखील विकत घेता येणार नाही हा i-Phone ; किंमत आहे 390 कोटी

Itel A24 Pro ची किंमत

Itel A24 Pro ला आता भारतात लॉंच करण्यात आलेले नाही. हा फोन लवकरच भारतात येऊ शकतो. सध्या याची विक्री बांग्लादेशमध्ये सुरू आहे. ज्याची किंमत BDT 5,990 (जवळपास 4600 रुपये) असणार. फोनचा रंग हिरवा असणार आहे.

टॅग्स :phone