
Gaming Headphones: हेडफोन हा हल्ली प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. प्रवासाच्या दगदगीपासून ऑफिसपर्यंत किंवा अगदी मित्रांपासून ऑनलाईन लेक्चरपर्यंत सर्वच ठिकाणी हेडफोन फार उपयोगी पडतात. पण तुम्ही जर गेम्सचे चाहते असाल तर बाजारात असेलेल्या गेमिंग अॅक्सेसरीजची असणं गरजेचं असतं. गेमिंग मध्ये लॅपटॉपपासून कीबोर्ड, फोन आणि हेडफोन्सपर्यंतचा समावेश असतो.
यात जेबीएल या इअरफोन कंपनीने भारतात आपले नवे गेमिंग हेडफोन्स JBL Quantum 350 लाँच केले आहेत. जर तुम्हाला व्हिडीओ किंवा कॉम्प्युटर गेम खेळण्याची सवय असेल, तर तुम्ही हे हेडफोन नक्की खरेदी करायला हवे. हे हेडफोन विशेषत: गेम खेळणाऱ्यांसाठी डिझाईन केलेले आहेत.
या हेडफोन्सचे स्पेसिफिकेशन काय आहेत ?
मुख्य म्हणजे हा नवीन हेडफोन वायरलेस गेमिंग हेडफोन आहे. या हेडफोनमध्ये 40 mm ऑडिओ ड्रायव्हर सपोर्ट मिळतो. यासोबतच कंपनीचा सिग्नेचर साउंड आणि इमर्सिव्ह JBL क्वांटम सराउंड सपोर्ट देखील तुम्हाला मिळतो. कंपनीने दावा केलाय की, लो-साउंड पासून हाय साउंड पर्यंत तुम्हाला क्वॉलिटी साउंड आउटपुट मिळतो. कंपनीने हेडफोन सोबत डिअटॅचेबल, डायरेक्शनल व्हॉइस-फोकस बूम माइक दिला आहे.
या हेडफोनला 22 तासांची बॅटरी लाइफ असल्याचा दावा कंपनीने केलाय. सोबतच हेडफोनला फास्ट चार्जिंगला सपोर्टही देण्यात आलाय. हेडफोनला 5 मिनिटांचं चार्जिंग असेल तर तो तासभर चालतो. हेडफोनला 2.4GHz वायरलेस कनेक्टिव्हिटी आणि USB Type-C पोर्ट चार्जिंग सपोर्ट करतो.
आता किंमतीचं बोलायचं झाल्यास एकाच रंगात म्हणजेच फक्त काळ्या रंगात उपलब्ध असणाऱ्या या हेडफोनची किंमत 8,499 इतकी आहे. JBL क्वांटम 350 JBL कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर, तसेच सर्व प्रमुख ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइट्स आणि किरकोळ स्टोअर्सवर उपलब्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.