
Best Postpaid Plans: गेल्याकाही वर्षात भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता वाढली आहे. या प्लॅटफॉर्म्ससाठी दरमहिन्याला शेकडो रुपये खर्च करावे लागतात. मात्र, सोप्या ट्रिकने तुम्हाला Netflix, Amazon Prime चे सबस्क्रिप्शन मोफत मिळेल. या प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मोफत कसे मिळू शकते, याविषयी जाणून घेऊया.
Airtel चा १,१९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
टेलिकॉम कंपनी एअरटेलकडे १,१९९ रुपये किंमतीचा शानदार पोस्टपेड प्लॅन उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएससह अनेक फायदे मिळतात. प्लॅनमध्ये ओटीटी सबस्क्रिप्शन देखील मोफत दिले जाते. यात Netflix, Amazon Prime आणि Disney+Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल.
Jio चा ३९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
Netflix आणि Amazon Prime चे मोफत सबस्क्रिप्शन हवे असल्यास हा पोस्टपेड प्लॅन तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. तुम्हाला अवघ्या ३९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. तसेच, ५जी डेटा देखील दिला जातो. प्लॅनमध्ये १ वर्षासाठी Amazon Prime Video चे सबस्क्रिप्शन दिले जाते. तसेच, २०० जीबी डेटा रोलओव्हरची देखील सुविधा मिळेल.
VI चा ५०१ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन
VI चा ५०१ रुपयांचा प्लॅन शानदार बेनिफिट्ससह येतो. यात प्लॅनमध्ये तुम्हाला Amazon Prime, Disney+Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. तसेच, रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटा वापरू शकता. प्लॅनमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर कॉलिंग, ९० जीबी डेटा दिला जातो. मात्र, लक्षात घ्या की या प्लॅनमध्ये Netflix चे सबस्क्रिप्शन मिळणार नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.