India GPT Platform : भारताचा स्वतःचा 'जीपीटी' प्लॅटफॉर्म येणार; ‘जिओ’ करणार भागीदारी

मुंबई आयआयटीच्या टेकफेस्टच्या उद्‍घाटनप्रसंगी बुधवारी ‘रिलायन्स जिओ’चे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी या भागीदारीची घोषणा केली.
India GPT Platform
India GPT PlatformeSakal

India's GPT Platform : भारताचा स्वतःचा स्वदेशी जीपीटी प्लॅटफॉर्म निर्माण करण्यासाठी भारत सरकारने पुढाकार घेतला असून, यासाठी रिलायन्स जिओने मदतीचा हात पुढे केला आहे. रिलायन्स जिओ यासाठी मुंबई आयआयटीला सहकार्य करणार आहे. मुंबई आयआयटीच्या टेकफेस्टच्या उद्‍घाटनप्रसंगी बुधवारी ‘रिलायन्स जिओ’चे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी या भागीदारीची घोषणा केली. मुंबई आयआयटीतील प्रा. गणेश रामकृष्णन हे भारतीयांसाठी जीपीटी आणि ‘लार्ज लँग्वेज मॉडेल सोल्युशन्स’ विकसित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

आयआयटी मुंबईत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या टेकफेस्ट या महोत्सवाला बुधवारी सुरुवात झाली. त्यामध्ये श्रद्धा शर्मा यांच्याशी झालेल्या संभाषणात अंबानी यांनी त्यांच्या महाविद्यालयीन दिवसांबद्दल तसेच आपल्या एकूण व्यवसायाबद्दल माहिती दिली.

टेलिकॉम आणि रिटेलसारख्या प्रमुख व्यवसायाच्या उभारणीसाठी वर्षभरापूर्वी भारतकेंद्रित बहुविध आणि बहुभाषिक मॉडेल वितरित करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेला भारत जीपीटी कन्सोर्टियम वॉश हा आयआयटी मुंबईच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक खासगी भागीदारी उपक्रम असून, यामध्ये आयआयटी मद्रास, आयआयटी मंडी, आयआयटी हैदराबाद, आयआयटी कानपूर, आणि आयआयएम इंदूरसारख्या प्रमुख तंत्रज्ञानविषयक शैक्षणिक संस्थांचा समावेश आहे. आयआयटी मुंबईतील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे प्रा. गणेश रामकृष्णन, ‘डीआरडीओ’चे माजी प्रमुख सतीश रेड्डी यांनी यांनी या वेळी संबोधित केले.

India GPT Platform
New York Times Vs AI : ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने दंड थोपटले; ‘ओपनएआय’, ‘मायक्रोसॉफ्ट’विरोधात न्यायालयात धाव

आम्ही २०१४ मध्ये फोर-जी ही सेवा लाँच केली होती. तेव्हापासून टेकफेस्टशी आमचा संबंध आहे. इतकेच नाही, तर तंत्रज्ञानाच्या संदर्भात आयआयटीबरोबर विविध स्तरांवरही सहयोग आणि संबंध सुरू आहेत. आता नवीन तंत्रज्ञानाच्या युगात आम्ही आयआयटी मुंबईबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रकल्प आणि भारत जीपीटीसाठी भागीदारी करत आहेत.

- आकाश अंबानी,अध्यक्ष, रिलायन्स जिओ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com