JIO कडून दोन दिवस फुकट सेवा मिळणार, कंपनीकडून घोषणा | JIO Declared Free Service for 2 Days | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

JIO Declared Free Service for 2 Days

JIO कडून दोन दिवस फुकट सेवा मिळणार, कंपनीकडून घोषणा

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत शनिवारी रिलायन्स जिओच्या दूरसंचार सेवेवर परिणाम झाला. यामुळे अनेक यूजर्सने कॉलसंबंधी तक्रारी केल्या. जीओच्या अहवालानुसार रात्री ८ नंतर दूरसंचार सेवा पूर्ववत करण्यात आली. लोकांना भेडसावणाऱ्या या समस्येमुळे कंपनीने दोन दिवसांचा अनलिमिटेड कॉलिंग प्लॅन जाहीर केला आहे. (JIO Declared Free Service for 2 Days)

दुपारनंतर ही समस्या कंपनीला समजली. वापरकर्त्यांनी सांगितलं की कॉल करताना त्यांना 'ग्राहक नेटवर्कवर रजिस्टर नाही असा मेसेज मिळत आहे. टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये अशा तक्रारी क्वचितच पाहायला मिळतात आणि याचे कारण अद्याप समजलेलं नाही. संध्याकाळी उशिरा ग्राहकांना पाठवलेल्या संदेशात कंपनीने अनेक ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्यांची कबुली दिली आणि या अडचणीमुळे अतिरिक्त दोन दिवसांचा 'अनलिमिटेड प्लॅन'ही जाहीर केला.

देशातील आघाडीची मोबाईल नेटवर्क सेवा पुरवणारी कंपनी असलेल्या जिओचे (Jio) नेटवर्क मुंबईत डाऊन झालं. शनिवारी दुपारी १२.१५ वाजतापासून नेटवर्क डाऊन झाल्यामुळे ग्राहकांना चांगलाच फटका बसला. यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली होती. शहरातील उड्डाणपुलांवरील मोबाइल नेटवर्क टॉवरविषयीच्या करारास मुदतवाढ देण्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नकार दिला. करार संपल्याने पुलावरील टॉवर हटवून संबंधित साहित्य जप्त करण्याची कारवाई एमएसआरडीसीकडून सुरू आहे. या कारवाईमुळे कॉल ड्रॉप, कॉल न लागणे, आवाज अस्पष्ट येणे, मोबाइल नेटवर्क नसणे, इंटरनेट (Internet service is down) वेग कमी होणे असा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागल्याची प्राथमिक माहिती होती.

Web Title: Jio Declared Free Calls And Internet Service For Two Days

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :reliance jio
go to top