esakal | JioPhone नंतर येतोय Jioचा सर्वात स्वस्त JioBook लॅपटॉप, पाहा फीचर्स
sakal

बोलून बातमी शोधा

JioBook Laptop

JioPhone नंतर येतोय Jioचा सर्वात स्वस्त JioBook लॅपटॉप

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

JioBook Laptop : टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ एकामागून एक स्वस्त गॅजेट्स लॉंच करत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वीच त्यांचा सगळ्यात स्वस्त 4G स्मार्टफोन JioPhone ची घोषणा केली आहे. येत्या दिवळीच्या आसपास हा किफायतशीर फोन लॉंच केला जाईल. त्याचबरोबर कंपनीने आता लॅपटॉप सेगमेंटमध्येही प्रवेश करण्याची तयारी केली असून लवकरच JioBook लॅपटॉप भारतात लॉंच केला जाऊ शकतो. नुकतीच या लॅपटॉपची ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) च्या वेबसाइटवर झलक पाहायला मिळाली.

काही रिपोर्टनुसार JioBook 4G LTE कनेक्टिव्हिटीने सुसज्ज असेल. त्याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, यात स्नॅपड्रॅगन प्रोसेसर दिले जाऊ शकते. याशिवाय 4 जीबी 4GB LPDDR4x रॅम आणि 64GB स्टोरेज या लॅपटॉपमध्ये दिले जाऊ शकते. जिओबुक लॅपटॉप कधी लाँच केला जाईल याबद्दल माहिती अद्याप उपलब्ध नाही. कंपनीने सध्या जिओबुक लॅपटॉपबद्दल अधिकृतपणे काहीही सांगितले नाही.

जिओबुकची बीआयएस सर्टिफीकेट वेबसाईटवर टीपस्टर मुकुल शर्मा यांनी ही लॅपटॉप स्पॉट केला होता . यानुसार JioBook तीन मॉडेल्समध्ये लॉन्च केले जाऊ शकते. हे तीन मॉडेल NB1118QMW, NB1148QMW आणि NB1112MM असतील. असे संकेत आहेत की रिलायंन्स Jio लॅपटॉप तीन वेगवेगळ्या व्हेरियंटमध्ये लॉंच केला जाऊ शकतो.

हेही वाचा: Nokia चा प्रत्येकाला परवडेल असा स्मार्टफोन Nokia C01 Plus लॉंच

जिओबुकमध्ये फीचर्स काय असतील

लीक झालेल्या माहितीनुसार, आगामी जिओ लॅपटॉपमध्ये एचडी (1,366x768 पिक्सेल) डिस्प्ले असू शकतो. हा लॅपटॉपला स्नॅपड्रॅगन 665 SoC सपोर्ट देण्यात येईल जे स्नॅपड्रॅगन X12 4G मॉडेमसह कनेक्टेड असते. यात 4GB LPDDR4x रॅम आणि 64GB पर्यंत eMMC ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आले आहे. कनेक्टिव्हिटी साठी मिनी HDMI कनेक्टर, ड्युअल-बँड वाय-फाय आणि ब्लूटूथचा समावेश असल्याचे सांगितले जाते. हा लॅपटॉप तीन-एक्सिस एक्सेलेरोमीटर आणि क्वालकॉम ऑडिओ चिप ) सह लॉंच केला जाऊ शकतो.

असाही दावा केला जात आहे की, JioStore, JioMeet आणि JioPages सारखे अॅप्स Jio च्या JioBook वर प्री इंस्टॉल आहेत. तसेच मायक्रोसॉफ्ट टीम्स, मायक्रोसॉफ्ट एज आणि ऑफिस सारखे मायक्रोसॉफ्ट अॅप्स देखील लॅपटॉपमध्ये देण्यात येतील. लॅपटॉपची किंमत आणि उपलब्धता याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तथापि, लॅपटॉप एक बजेट ऑफर असल्याची अपेक्षा केली जाऊ शकते. Jio च्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (AGM) 2021 आवृत्ती दरम्यान JioBook लाँच करण्यापूर्वी सांगितले होते, परंतु तसे झाले नाही.

हेही वाचा: MG Astor SUV भारतात लाँचिंगसाठी सज्ज; काय आहेत फीचर्स? वाचा

loading image
go to top