Key Facts : गाडीसोबत दोन चाव्या का दिल्या जातात? फक्त हरवण्याचीच भिती नाही तर हे आहे दुसरे कारण

कंपनी एकाच वेळी गाडीसह दोन चाव्या का देते माहितीये का?
Key Facts
Key Factsesakal

Key Facts : कार आणि मोटरसायकल विकत घेताना कायम तुम्हाला दोन चाव्या दिल्या जातात. दोन्ही चाव्या अशा असतात की त्याने गाडी लगेच सुरू होईल. मात्र कंपनी एकाच वेळी गाडीसह दोन चाव्या का देते माहितीये का? अनेकांना असं वाटतं की एक चावी हरवली की दुसऱ्या चावीचा वापर करता यावा म्हणून दुसरी चावी दिली जाते. मात्र यामागे आणखी काही कारणं आहेत.

अनेक कारसह दिल्या जाणाऱ्या दोन चाव्या एक तर सेंट्रल लॉक फंक्शनसह येतात तर दुसरी चावी साधी असते. यात सेंट्रल लॉक रिमोटचे डिव्हाइस अटॅच नसते. यामागे एक मोठे कारण आहे. चला तर कार आणि बाइकसह दोन चाव्या देण्यामागे काय कारण आहे ते जाणून घेऊया.

एक कारण

एक चावी हरवल्यावर किंवा कार आतून लॉक झाल्यास अर्थातच दुसरी चावी महत्वाची भूमिका बजावते.

मात्र त्यामागे आणखीही दुसरी कारणं आहेत.

लॉक खराब होऊ नये म्हणून

चावी हरवल्यानंतर डुप्लिकेट चावी बनवत लॉक खोलल्यास कारचे इंजिन इमोबिलायझर खराब होऊ शकते. जे गाडीच्या सुरक्षेसाठीसुद्धा धोक्याचे ठरू शकते. अशा समस्यांपासून बचावासाठी दोन चाव्या दिल्या जातात.

कार स्टार्ट करण्यासाठी

इंजिन इंमोबिलायझर लैस हे फिचर असलेल्या गाड्या चावी शिवाय सुरु होतात. अशात एखादी चावी हरवल्यास दुसऱ्या चावीने कार स्टार्ट केली जाऊ शकते.

Key Facts
Gk Facts : भारतातला सगळ्यात मोठा जिल्हा माहितीये? एकेकाळी होते राज्य..

का दिल्या जातात वेगवेगळ्या चाव्या

अनेक कारसह चाबी सेंट्रल लॉक रिमोटसह अटॅच मिळते. तर दुसरी चावी सिंपल असते. यामागचे कारण म्हणजे दुसरी चावी केवळ इमरजंसीसाठी दिली जाते. जर तुमची प्रायमरी की (Primary Key) हरवली तर दुसऱ्या चावीचा वापर तुम्ही कार अनलॉक करून सुरू करण्यास करू शकता.

Key Facts
Key Watch : डिजीटलच्या युगात चावीच्या घड्याळांना सुरू ठेवणारा अवलिया

चावी हरवल्यास काय करावे?

चावी हरवल्यास लगेच कारच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरला भेट द्या. आणि लॉक सेटमध्ये बदल करून चाव्यांचा नवा सेट घ्या. यामुळे तुमची कार सुरक्षित राहील. आणि चाव्यांचा नवा सेटही तुम्हाला मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com