रॉयल एनफिल्डला टक्कर देणार ही दमदार बाईक! बुकींग सुरू | Keyway K-Lite 250V | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Keyway K-Lite 250V
रॉयल एनफिल्डला टक्कर देणार ही दमदार बाईक! बुकींग सुरू | Keyway K-Lite 250V

रॉयल एनफिल्डला टक्कर देणार ही दमदार बाईक! बुकींग सुरू

रॉयल एनफिल्डने (Royal Enfield) गेली अनेक वर्षे भारतीय लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. पण आता मात्र रॉयल इनफिल्डला तगडं आव्हान देईल अशी एक नवी मोटारसायकल भारतीय बाजारात दाखल झाली आहे. होय, एका हंगेरियन दुचाकी निर्माता कंपनीने भारतात 3 नवीन उत्पादने लाँच केली आहेत. या नवीन पोर्टफोलिओमध्ये, रेट्रो स्टाइल स्कूटर सिक्सटीज 300 (Sixties 300), विएस्टे 300 (Vieste 300) नावाची मॅक्सी स्कूटर आणि नवीन क्रूझर मोटरसायकल के लाईट (K Light 250V) यांचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला या स्कूटरबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. चीनच्या Qianjing ग्रुपचा हा ब्रँड आहे.

हेही वाचा: इलेक्ट्रिक कार खरेदी करायची आहे? ही सरकारी बँक देतेय स्वस्तात कर्ज

डिझाइन आणि स्टाईलमध्ये उत्तम:

स्वस्तात मस्त क्रूझर मोटरसायकल Keyway K-Lite 250V ही Harley-Davidson Fat Bob सारखी दिसते. विदेशी बाजारपेठेत ही बाईक 125 आणि 200 सीसी व्हेरियंटमध्ये येते. भारतात मात्र ही बाईक 250 सीसी इंजिनसह लॉन्च केली जाईल.

या बाईकचा आकार खूप मोठा असेल आणि कंपनी ती मॅट ब्लॅक, मॅट ब्लू आणि मॅट ग्रे या 3 रंगांमध्ये ऑफर करेल. यात फ्यूल टँक, एलईडी लाईट्स, टेरेस्ड सीट्स, इंजिन गार्ड, दोन सायलेन्सर अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. ही बाईक कमी पॉवरफुल असली तरी रॉयल एनफिल्डच्या तुलनेत एक उत्तम पर्याय बनू शकते.

हेही वाचा: सर्वाधिक मायलेज देणारी स्टायलिश कार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

इंजिन देखील दमदार -

कीवे के-लाइट 250V मध्ये 249 सीसी व्ही-ट्विन एअर-कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 18.7 Bhp पॉवर आणि 19 Nm पीक टॉर्क जनरेट करते. जर तुम्हाला ही बाईक आवडली असेल तर तुम्ही ती फक्त 10,000 रुपयांच्या टोकनने बुक करू शकता, परंतु कंपनीने अद्याप तिची अंतिम किंमत सांगितलेली नाही.

Web Title: Keyway K Lite 250v Bike Launched In India Compete With Royal Enfield

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bikemotor cycle
go to top