Kia ची इलेक्ट्रिक एसयूव्ही; एकदा चार्ज केल्यास चालेल 483 किमी | Kia EV9 Concept | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kia EV9 Concept

Kia ची इलेक्ट्रिक एसयूव्ही; एकदा चार्ज केल्यास चालेल 483 किमी

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सध्या इलेक्ट्रिक कारची वाढती क्रेझ पाहता ऑटोमोबाईल कंपन्या आपली नवीन वाहने बाजारात आणण्याच्या तयारीत आहेत. Kia ने लॉस एंजेलिस ऑटो शोमध्ये त्याची Concept EV9 SUV सादर केली आहे. कंपनीची ही आलिशान इलेक्ट्रिक एसयूव्ही बॉक्सी डिझाइन आणि अँगुलर एक्सटीरियरसह येते. ही SUV कंपनीने E-GMP प्लॅटफॉर्मवर तयार केली असून कंपनीच्या दाव्यानुसार ती एका चार्जमध्ये 483 किमी पर्यंतची धावते.

स्पेसिफिकेशन्स

Concept EV9 SUV चा लूक खूप दमदार असून कंपनी विंडशील्डच्या तळाशी एक मस्क्यूलर यू शेप बोनेटसह सोलर पॅनेल देखील ऑफर करणार आहे. मोठमोठे चौकोनी आकाराचे हेडलाइट्स आणि कारचे उभ्या DRL मुळे गाडीला दमदार लुक मिळतो. या आगामी एसयूव्हीमध्ये रिट्र्क्टेबल रुफ रेल्स, Y-आकाराची टेललाइट आणि हँडल-लेस दरवाजे देण्यात आले आहेत. Kia च्या या SUV मध्ये साइड मिरर एवजी कॅमेरे देण्यात आले आहेत.

Kia EV9 इलेक्ट्रिक Electric Global Modular Platform बनवण्यात आले आहे. ही कार एकदा चार्ज केल्यास 483 किमी पर्यंत चालते. असा कंपनीचा दावा आहे . SUV सह, कंपनी 350kW चा चार्जर देत आहे, कंपनीकडून असे सांगितले जात आहे की हा चार्जर SUV ची बॅटरी 30 मिनिटांत 10-80 टक्के चार्ज करू शकतो.

हेही वाचा: Tata Altroz ​​प्रीमियम हॅचबॅकचे नवीन व्हेरियंट भारतात लॉन्च

27-इंचाचा डिस्प्ले

या SUV च्या डॅशबोर्ड इंटीरियरमधील डिस्प्ले देखील प्रीमियम देण्यात आला आहे. 3-रो केबिन, अष्टकोनी स्टीयरिंग व्हील, अॅम्बियंट लाइटिंग आणि पॅनोरॅमिक ग्लास रूफ देण्यात आले आहेत. एसयूव्हीच्या डॅशबोर्डमध्ये 27-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. SUV ची खास गोष्ट म्हणजे यामध्ये दिलेल्या सीट गरजेनुसार बदलल्या जाऊ शकतात.

हेही वाचा: भारतासाठी गुगलच्या अनेक घोषणा; युजर्सना मिळणार जबरदस्त फीचर्स

loading image
go to top