
तुमच्या नावावर दुसरंच कोणी सिमकार्ड वापरतंय? सोप्या पध्दतीने घ्या जाणून
जेव्हा आपण नवीन सिम (Sim Card) खरेदी करता तेव्हा आपल्याला वाहन चालक परवाना (Drivers License) किंवा मतदान कार्डची (Voter ID) फोटो कॉपी द्यावी लागते. परंतु बर्याच वेळा स्थानिक सिम प्रोव्हायडर (Sim Provider) आपल्या फोटो आणि ओळखपत्राची बनावट प्रत तयार करतात आणि आपल्या नावावर अनेक बनावट सिम कार्डची ते विक्री करतात. या सिमकार्ड वापरुन जर कोणी गुन्हा केला असेल तर तुम्हीच त्यासाठी जबाबदार ठरतात. तसेच अनेक प्रसंगी एखाद्याला तुरुंगात जावे लागू शकते. अशा परिस्थितीत आपल्या आयडीवर बनावट सिम कोण चालवित आहे हे आपण ऑनलाइन शोधू शकता. सरकारी पोर्टलच्या मदतीने हे बनावट सिम देखील ब्लॉक केले जाऊ शकतात. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत- (know about how you can check how many sim cards your id)
दूरसंचार विभागाने केले पोर्टल लॉन्च
दूरसंचार विभागाने tafcop.dgtelecom.gov.in डोमेन वरून पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलमध्ये देशभरातसर्व मोबाइल क्रमांकाचा डेटाबेस अपलोड केला जातो. या पोर्टलच्या मदतीने, स्पॅम आणि फसवणूक रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपल्या नावावर एखादा दुसरा मोबाइल नंबर वापरत आहे असा आपला संशय असल्यास आपण या वेबसाइटद्वारे तक्रार दाखल करु शकता. एका आयडी वर जास्तीत जास्त 9 सिम कार्ड दिले जाऊ शकतात. आपल्या आयडीवर बनावट सिमकार्ड चालत आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही या वेबसाईटवरुन ते ब्लॉक देखील करु शकता.
हेही वाचा: Airtel चा जबरदस्त प्लॅन! 19 रुपयांमध्ये मिळणार 200MB डेटा
ही संपूर्ण आहे प्रक्रिया
वापरकर्त्यांनी प्रथम tafcop.dgtelecom.gov.in वर दूरसंचार विभागाच्या पोर्टल वर जावे लागेल
आपल्याला आपला 10 अंकी मोबाइल नंबर येथे टाकावा लागेल
यानंतर, मोबाइल नंबर पडताळणीसाठी आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल.
हा ओटीपी टाकल्यास आपला नंबर पडताळला जाईल.
यानंतर त्या सर्व मोबाइल क्रमांकाची यादी येईल जी तुमच्या आयडीवर चालत आहेत.
या सरकारी पोर्टलवर वापरकर्त्यांना या बनावट क्रमांकाबद्दल तक्रार करता येईल.
आपण नमूद केलेल्या बनावट क्रमांकावर सरकार चौकशी करेल.
हा नंबर आपल्या आयडीवर कार्यरत असल्याचे आढळल्यास तो ब्लॉक केला जाईल.
(know about how you can check how many sim cards your id)
हेही वाचा: रेग्युलर फॅन्सपेक्षा एनर्जी सेव्हर फॅन्स का आहेत बेस्ट: जाणून घ्या
Web Title: Know About How You Can Check How Many Sim Cards Your
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..