तुमच्या अँड्रॉइड फोनचा बॅकअप हवाय? मग या आहेत काही टिप्स आणि ट्रिक्स 

know how to take backup of your android phone Nagpur News
know how to take backup of your android phone Nagpur News

नागपूर: स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांमध्ये सर्वात जास्त प्रमाणात लोकं मोबाईलमध्ये निर्माण होणाऱ्या स्टोरेजच्या समस्येमुळे हैराण असतात. त्यात व्हाट्स अप, इंस्टाग्राम, फेसबुक अशा प्रकारच्या सोशल मीडियामुळे स्मार्टफोनमध्ये अनेक प्रकारचे मालवेअर  येतात. महत्वाची गोष्ट म्हणजे स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांना स्टोरेजची समस्या येते. तुमच्या फोनमध्ये स्टोरेज फुल झाल्यास किंवा फोनमध्ये मालवेअर शिरल्यास स्मार्टफोन क्रॅश होण्याची शक्यता असते. यासाठी आपल्याला बॅकअप घेणं महत्वाचं असतं. मात्र अनेकांना बॅकअप घेता येत नाही आणि त्यामुळे त्यांच्या फोनमध्ये असलेला संपूर्ण डेटा ते परत मिळवू शकत नाहीत. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अँड्रॉइड फोनचा बॅकअप घेण्याच्या काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहोत.     

मार्केटमध्ये बॅकअप घेण्यासाठी अनेक अप्लिकेशन उपलब्ध आहेत. मात्र त्यांचा उपयोग करून प्रत्येकालाच बॅकअप घेता येईल असं नाही. मात्र आता या अप्लिकेशन्सचा वापर न करता बॅकअप घेण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत. 

क्लाउडवर घ्या बॅकअप 

  • आपल्या फोनच्या सेटिंग मेनूला ओपन करा. त्यानंतर अकाउंट्स अँड सिंक या पर्यायाला ओपन करा. 
  • यानंतर ऑटो सिंक डेटावर क्लिक करा 
  • यानंतर गुगलवर क्लिक करा आणि आपल्या Gmail आयडीला क्लिक करा. 
  • यांनतर गुगल संबंधीची संपूर्ण माहिती क्लाउडला तुम्ही सिंक करू शकता. 
  • सेटिंगमध्ये जा आणि यानंतर बॅकअप अँड रिसेट डेटावर क्लिक करा. 
  • अशा पद्धतीनं तुम्ही क्लाउडवर बॅकअप घेऊ शकता.  

मीडिया, मेसेज आणि सिस्टम बॅकअप 

  • यासाठी आपल्या फोनला USB केबलने कनेक्ट करा. 
  • जर तुम्ही Mac वापरत असाल तर Android File Transfer ही अप्लिकेशन आहे का हे तपासून घ्या. 
  • यानंतर कम्युटरवर My Computer ओपन करा. 
  • ज्या फाईल्सचा बॅकअप ग्घ्यायचा आहे त्या SD फाईलला नेव्हिगेट करून कॉपी करून घ्या.
  • अशाप्रकारे तुम्ही तुमच्या फाईल्सचा बॅकअप घेऊ शकता.   

SMS बॅकअप 

  • यासाठी SMS Backup+ डाउनलोड करा आणि ओपन करून कनेक्टवर क्लिक करा. 
  • यानंतर पॉपअपमध्ये आपलं Gmail अकाउंट शोधा आणि ऍक्सेसची परवानगी द्या. 
  • पुन्हा एकदा अप्लिकेशनमध्ये जा आणि बॅकअपवर क्लिक करा. यानंतर तुमचे सर्व टेक्स्ट मेसेज तुमच्या Gmail अकाउंटवर सेव्ह होतील.
  • यामुळे तुम्ही तुमचे टेक्स्ट मेसेज Gmail वर वाचू शकता. 
  • या मेसेजना SMS Backup+ रिस्टोरवर क्लिक करा आणि पॉपअपवर 'ok' वर क्लिक करा. 
  • SMS Backup+ ला  डिफॉल्ट एसएमएस अप्लिकेशन म्हणून निवडा. 
  • यानंतर हे अप्लिकेशन तुमच्या टेक्स्ट मेसेजचे बॅकअप घेईल. 

अप्लिकेशन बॅकअप 

  • यासाठी सर्वात पहिले ES File Explorer डाउनलोड करा आणि Homepage वर क्लिक करा. 
  • वरती असलेल्या अँड्रॉइड रोबोटच्या खाली असलेल्या अप्लिकेशनवर क्लिक करा. 
  • जोपर्यंत कुठल्या आयकॉनवर चेकमार्क दिसत नाही तोपर्यंत होल्ड करून ठेवा. आणि सर्व आयकॉन्सना सिलेक्ट करा. 
  • यानंतर खाली तुम्हाला बॅकअपचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
  • यामुळे तुमचे apk फाईल्स सेव्ह होतील. 
  • सेव्ह झालेत की नाही हे बघण्यासाठी User apps वर क्लिक करा आणि Backed-up Apps मध्ये जा.
  • यानंतर तुम्ही बॅकअप घेतलेल्या अप्लिकेशन्स पुन्हा इन्स्टॉल करू शकता. 
  • या फाईल्स तुम्ही पेन ड्राइव्हमध्ये सेव्ह करून ठेऊ शकता. 
  • नवीन मोबाईल घेतल्यास या फाईल्स तुम्ही कॉपी करू शकता. 

संपादन आणि संकलन - अथर्व महांकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com