सॅटेलाईट इंटरनेट म्हणजे काय? याचे फायदे-तोटे काय आहेत? वाचा

Satellite Internet
Satellite InternetGoogle

आजच्या काळात इंटरनेट ही गरज बनली आहे, छोट्या-मोठ्या प्रत्येक कामासाठी आजकाल इंटरनटचा वापर होतोय. मात्र अद्याप देखील जगभरात अशी बरीच ठिकाणे आहेत जेथे अद्याप इंटरनेट सेवा, ऑप्टिकल फायबर पोहोचले नाही, अशा सर्व ठिकाणी सध्या चर्चेत असलेले सॅटेलाईट इंटरनेट उपयुक्त ठरू शकते. स्पेस एक्सच एलोन मस्कने स्टारलिंक सॅटेलाईट इंटरनेट सर्व्हिस येत्या काळात भारतात सुरु होऊ शकते. जेथे लोकांना अजून हायस्पीड इंटरनेटची सुविधा मिळत नाही तेथे सॅटेलाईट इंटरनेट (Satellite Internet) उपयोगी ठरू शकते. एलोन मस्कची (Elon Musk) स्टारलिंक (Starlink) सॅटेलाईट इंटरनेट सर्व्हिस देखील लवकरच भारतात दाखल होऊ शकते. सध्या त्यासाठी प्रशासकीय परवानगी घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नेमकं काय आहे सॅटेलाईट इंटरनेट?

स्टारलिंक हा एक सॅटेलाईट इंटरनेट प्रोजेक्ट आहे, यामध्ये सॅटेलाईटच्या मदतीने इंटरनेट सर्व्हिस दिली जाते ज्यासाठी कुठल्याही ग्रांउड इन्फ्रास्ट्रक्चरची गरज पडत नाही. कुठलेही टॉवर किंवा वायर तसेच इतर कुठलेही माध्यम नसताना लेसर बीम वापरून डेटा ट्रान्सफर केला जाते. स्टारलिंकच्या वेबसाइटनुसार या सॅटेलाईट इंटरनेटती प्री-बुकिंग $ 99 म्हणजेच सुमारे 7,200 रुपयांना सुरू झाली आहे. सध्या हा दर फक्त बीटा ग्राहकांसाठी आहे. जेव्हा ही सेवा सामान्य लोकांसाठी उपलब्ध होईल तेव्हा ही किंमती वर किंवा खाली जाऊ शकते.

Satellite Internet
iPhone 13 सीरीज नंतर स्वस्त झाले iPhone 11, iPhone 12

सॅटेलाईट इंटरनेट कसे चालते?

स्टारलिंक ही सॅटेलाईट आधारित इंटरनेट सेवा आहे जी आपल्या घरांमध्ये सिग्नल पाठवण्यासाठी सॅटेलाईटचा वापर करते. यासाठी लोअर ऑर्बिट सॅटेलाईटचा वापर केला जातो. या लोअर ऑर्बिट सॅटेलाईटचा लेटन्सी रेट म्हणजे एका पॉंइटपासून दुसऱ्या पॉंइट पर्यंत डेटा पोहचवण्यासाठी लागणारा वेळ खूपच कमी असतो. यामुळे, ऑनलाइन बफरिंग, गेमिंग आणि व्हिडिओ कॉलिंगची क्वालीटा कित्येक पटीने चांगली होते. विशेष म्हणजे स्टारलिंकचे काम डिश टीव्ही सेवांसारखेच आहे. स्टारलिंक इंस्टॉल करण्यासाठी डिशचा वापर केला जातो, ज्याला मिनी सॅटेलाईटकडून सिग्नल मिळतात. जून 2021 पर्यंत पृथ्वीभोवती सक्रिय असलेल्या स्टारलिंक सॅटेलाईटची संख्या 1,500 पेक्षा जास्त होती.

भारतातील बहुतेक इंटरनेट वापरकर्ते फायबरवर अवलंबून आहेत, जे सॅटेलाईट इंटरनेटच्या तुलनेत हाय स्पीड इंटरनेट देते. मात्र स्टारलिंकच्या इंटरनेटसाठी तुम्हाला वायर्ड कनेक्शनची गरज पडत नाही. जगभरात कुठेही ते सहजपणे मिळवता येते. फायबर कनेक्शनच्या बाबतीत मात्र अडचणी येऊ शकतात. सध्या स्टारलिंकचा इंटरनेट स्पीड 50 एमबीपीएस ते 150 mbps दरम्यान आहे. तसेच ती 300 mbps पर्यंत पोहोचण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

Satellite Internet
Realme चा सर्वात स्वस्त 50 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन लॉंच

सॅटेलाईट इंटरनेटचे फायदे, तोटे

उपग्रह इंटरनेट जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून एक्सेस केले जाऊ शकते, अगदी दुर्गम भागात देखील ही इंटरनेट सेवा मिळवता येते. मात्र सध्यातरी यासाठी लेटेंसी ही एक समस्या ठरु शकते. तसेच या इंटरनेट सेवेसाठी आकाश निरभ्र असले पाहिजे. मुसळधार पाऊस किंवा जोरदार वारा कनेक्शनमध्ये व्यत्यय आणू शकतो, ज्यामुळे इंटरनेटची स्पीड कमी होऊ शकते. तसेच सटेलाईट इंटरनेटमघ्ये तुम्हाला व्हीपीएन सपोर्ट मिळणार नाही.

सेवा आणि इंटरनेट स्पीडबाबज सध्यातीर 5G ने स्टारलिंकच्या सॅटेलाईट इंटरनेटला मागे टाकले आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत, ग्रामीण भाग, लहान शहरे किंवा अगदी दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी सॅटेलाईट इंटरनेट हा चांगला पर्याय असू शकतो, कारण अशा ठिकाणी सेल्युलर टॉवरसारख्या पायाभूत सुविधांची गरज पडणार नाही. तसेच चक्रीवादळ, भूकंप आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा धोका असणाऱ्या क्षेत्रांसाठी हे उपयोगी ठरेल.

Satellite Internet
टाटाची नवीन इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये धावेल 213 किमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com