स्मार्टफोन खरेदी करताना भारतीय 'या' फीचर्सना देतात प्राधान्य

smartphone
smartphoneGoogle

नवीन स्मार्टफोन खरेदी करताना प्रत्येकाला वेगळं काहीतरी हवं असते बऱ्याच जणाना जास्त वेळ चालणारी बॅटरी पाहिजे असते, तर काही ग्राहकांना फोटोग्राफीसाठी फोनमध्ये चांगला कॅमेरा पाहीजे असतो. पण स्मार्टफोन विकत घेताना सध्या भारतीय ग्राहक कोणत्या गोष्टींकडे जास्त लक्ष देतात हे तुम्हाला माहिती आहे का? अॅमेझॉन इंडियाने केलेल्या मोबाईल सर्वेक्षणतून हे उघड झाले आहे.

या रिपोर्टनुसार भारतीय ग्राहक सर्वात जास्त मिड रेंज स्मार्टफोन खरेदी करणे पसंत करतात. याचे प्रमाण सुमारे 37% आहे, म्हणजेच 37 टक्के भारतीयांना ज्याची किंमत 15,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान आहे असे फोन खरेदी करायचे असतात.

भारतीयांचे आवडते स्मार्टफोन

सॅमसंग, शाओमी आणि वनप्लस या कंपन्यांचे स्मार्टफोन हे भारतीय ग्राहकांना सर्वाधिक आवडलेले स्मार्टफोन आहेत. यापैकी सुमारे 24% भारतीयांना सॅमसंग स्मार्टफोन आवडतात. त्यानंतर शाओमी आणि वनप्लसचा क्रमांक येतो. भारतामध्ये ज्या स्मार्टफोनला सर्वाधिक पसंती दिली जाते त्यामध्ये Redmi Note 10 Series, OnePlus Nord Series (Nord 2, Nord CE), OnePlus 9 सीरीज आणि Samsung M21 आणि इतरGalaxy M सीरीजचा समावेश आहे.

smartphone
कमी किमतीत 'या' आहेत बेस्ट बाईक्स, मिळेल 90Kmpl मायलेज

स्मार्टफोन विकत घेताना भारतातील ग्राहक कॅमेरा, बॅटरीची क्षमता, डिस्प्ले क्वालिटी यांना जास्त महत्त्व देतात. एलसीडी, एमोलेड आणि रिझोल्यूशन एचडी +, एफएचडी +, क्यूएचडी + या फीचर्सना जास्त महत्व दिले जाते. तसेच भारतात 54 टक्क्यांहून अधिक लोकांना 5G फोन खरेदी करायचा आहे त्यासोबतच भारतातील सुमारे 46% लोकांना 5000mAh आणि 6000mAh बॅटरी हव्या आहेत. मागच्या काळात सुमारे 96% लोकांनी AMOLED डिस्प्ले वापरला असून. 66% लोकांना FHD+ रिझोल्यूशन डिस्प्ले फोन खरेदी करायचा आहे. तर या दरम्यान 61% लोकांना स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट हवा दिसतो. आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे 31 टक्के ग्राहक हे चांगली डिस्काउंट ऑफर पाहून स्मार्टफोन खरेदी करतात. तर 21 टक्के ग्राहक एक्सचेंज ऑफरवर आणि 20% नो-कॉस्ट ईएमआयवर स्मार्टफोन खरेदी करण्यास पसंती देतात.

smartphone
महिंद्रा बोलेरो निओच्या किंमतीत वाढ, काय असेल नवीन किंमत?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com