रुग्णालयांना सायबर हल्ल्यांचा वाढता धोका; काय आहेत कारणे? वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cyber attacks on hospitals

रुग्णालयांना सायबर हल्ल्यांचा वाढता धोका; काय आहेत कारणे? वाचा

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सध्या जगभरात प्रत्येक कार्य क्षेत्रात इंटरनेटचा वापर प्रचंड वाढला आहे, प्रत्येक कामात प्रगत तंत्रज्ञान वापरासाठी इंटरनेट अवलंबून आहोत. याचे फायदे असंख्य असले तरी याच्या माध्यमातून वेठीस धरण्याचे प्रकार घडत असतात. यासाठी हेल्थकेअर सेक्टर देखील अपवाद ठरत नाही. सध्या जगभरात रुग्णालयांवर सायबर हल्ले (cyber attack) केले जात असून, हॅकर्सकडून रुग्णांची गोपनीय माहिती/डेटाशी लीक करण्याची धमकी देत खंडणी मागीतली जाण्याच्या घटना घडत आहेत. इतकेच नाही तर रुग्णालयातील वैद्यकिय उपकरणे हॅक करुन रुग्णांच्या जीवाशी खेळ होत आहे. रुग्णालयांवर सायबर हल्ल्यांच्या वाढत्या धोक्यांविषयी आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत.

रुग्णालये त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांची माहिती मोठ्या प्रमाणात ऑनलाईन साठवून ठेवातात आणि हि माहित हॅकर्स सहजपणे मिळवू शकतात. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगात रुग्णांच्या अशा खासगी माहितीसाठी मोठी किंमती मिळू शकते. त्यामुळे रुग्णालयांवर होणाऱ्या सायबर हल्ल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

मेडिकल डिव्हाइस ठरतात सोपे टार्गेट

आजकाल हेल्थकेअर तंत्रज्ञानामध्ये बरीच उपकरणे आहेत ज्यांचा रुग्णांसाठी मोठा प्रमाणात वापर केला जातो. जसे की एक्सरे, इन्सुलिन पंप आणि डिफिब्रिलेटर सारखी वैद्यकीय उपकरणे. परंतु ऑनलाइन सुरक्षा आणि रुग्णांचा डेटा सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने यांना हॅक करणे सोपे असते. कारण वैद्यकीय उपकरणे एका वेगळ्या हेतूसाठी तयार केली गेलीली असतात, त्यामध्ये अशा हल्ल्यांपासून बचाव करण्याची कोणतीही सुविधा नसते. जरी उपकरणे डेटा साठवू शकत नसतील तरी त्यांचा वापर माहिती असलेल्या सर्व्हरवर हल्ला करण्यासाठी केला जाऊ शकतो. सर्वात वाईट म्हणजे, ही वैद्यकीय उपकरणे हॅकर्सद्वारे पूर्णपणे ताब्यात घेतली जाऊ शकतात, ज्यामुळे हॉस्पिटल्सना रुग्णांना जीवनावश्यक उपचार देण्यापासून रोखता येते. हॅकर्ससाठी असे लॅपटॉप आणि कॉम्प्युटर सारखे इतर नेटवर्क डिव्हाईस ज्यामध्ये सुरक्षिततेचा अभाव आहे अशी उपकरणे हॅक करणे सोपे ठरतात.

डिव्हाइसची संख्या

हेल्थ केअर सेक्टरमध्ये एका रुग्णालयात बरेच लोक एकत्र काम करत असताता, रुग्णांना हेल्थ केअर देण्यासाठी अनेक जण रुग्णांची माहिती वेगवेगळ्या डिव्हाइसेसवरून एक्सेस करतात. अशा परिस्थितीत संस्थेच्या नेटवर्कशी नवीन डिव्हाइसेसवरून कनेक्ट केले जाते जे धोकादायक ठरते, कारण सर्व डिव्हाइसेस सुरक्षित नसतात आणि त्यामुळे सायबर अटॅकचा धोका वाढतो. हेल्थ केअर संस्था मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या डेटा साठवूण ठेवतात, सोबतच या सिस्टीमला त्यांच्या वैद्यकीय उपकरणांच्या नेटवर्क देखील जोडलेले असते. यामध्ये मोठ्या संस्थांमध्ये हजारो वैद्यकीय उपकरणे कनेक्टेड असू शकतात, अशा वेळी हॅकर्ससाठी प्रत्येक उपकरण सायबर अटॅकसाठी वापरले जाऊ शकते.

कर्मचाऱ्यांना धोक्यांविषयी माहिती नसणे

हेल्थकेअर कर्मचारी हे त्यांच्या कामात व्यस्त असतात त्यांना सायबर सेक्युरिटी सारख्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळणे शक्य होत नाही. हेल्थ केअर वर्कर्सना वैद्यकिय क्षेत्रातील पुरेपुर माहिती असते, पण त्यांना ऑनलाइन धोक्याबद्दल माहिती नसते. त्यातच वैद्यकिय संस्थेचे बजेट, संसाधने आणि वेळेची कमतरता याचा अर्थ सर्व कर्मचाऱ्यांना सायबरसुरक्षे बद्दल प्रशिक्षण देणे बऱ्याचदा शक्य होत नाही त्यामुळे सायबर हल्ला टाळण्यासंबंधीची पुरेशी काळजी घेतली जात नाही.

हेही वाचा: सर्वात स्वस्त पण सर्वात सेफ, TATA ची 'ही' SUV ठरली बेस्ट

आउटडेटेड टेक्नोलॉजी

मागच्या काही वर्षांत वैद्यकीय तंत्रज्ञानाती अविश्वसनीय प्रगती केली आहे, मात्र मर्यादित बजेट आणि नवीन सिस्टीम बद्दल स्विकारण्याची अर्थ बहुतेक वैद्यकीय तंत्रज्ञान कालबाह्य झालेले आहे. अनेक हॉस्पिटल्समध्ये जूने तंत्रज्ञान वापरतात ज्यांना सिस्टम अपडेट करण्याची गरज आहे जारी करणारी प्रणाली वापरणारी रुग्णालये सर्व सॉफ्टवेअर लेटेस्ट अपडेट केली पाहिजेत. या अपडेटमध्ये सामान्यत: बग फिक्स केलेल्या असतात जे सिस्टमला बऱ्यापैकी सुरक्षित ठेवतात. सॉफ्टवेयर मध्ये अतिरिक्त सुरक्षा लेव्हल जोडून सायबर हल्ल्यांचा धोका कमी करणे शक्य आहे.

छोट्या रुग्णालयांना देखील धोका

सर्व आरोग्य संस्थांना ऑनलाइन हल्ला होण्याचा धोका आहे. मोठ्या हॉस्पिटल्सकडे सर्वात जास्त डेटा असतो, पण त्यांच्याकडे सुरक्षेची काळजी देखील घेतलेली असू शकते. परंतु छोट्या रुग्णालयांचे सुरक्षा बजेट कमी असते आणि त्यांची कमी गुंतागुंतीचे आणि अपडेट नसलेली सायबर सुरक्षेमुळे हॅकर्सना अशा रुग्णालयांवर हल्ला करणे सहसा सोपे जाते. सर्व प्रकारच्या हेल्थ केअर सेंटर्सना सध्या प्रभावी सायबर सुरक्षा उपाय करणे आवश्यक बनले आहेत, कारण या सर्वांकडेच रुग्णांचा पर्सनल डेटा साठवलेला असतो.

हेही वाचा: Jio चे जबरदस्त प्रीपेड प्लॅन, फ्री कॉलिंगसह रोज मिळेल 2GB डेटा

loading image
go to top