keyboard shortcuts: लॅपटॉपवर सहज काढता येईल स्क्रीनशॉट, जाणून घ्या या कामाच्या Shortcut Keys

तुम्हाला जर Shortcut Keys माहित असल्यास लॅपटॉपवरील अनेक कामे लवकर होतात. अशा महत्त्वाच्या Shortcut Keys विषयी जाणून घ्या.
Laptop
LaptopSakal
Updated on

Keyboard Shortcut Keys List: स्मार्टफोनप्रमाणेच लॅपटॉप देखील महत्त्वाचे डिव्हाइस आहे. लॅपटॉपच्या मदतीने अनेक कामे सहज करता येतात. याशिवाय, तुम्हाला जर शॉर्टकट की माहिती असतील तर लॅपटॉपवरील काम अजूनच लवकर होते. Shortcut Keys माहित असल्यास वेळेची देखील बचत होते. अशाच काही उपयोगी येणाऱ्या Shortcut Keys विषयी सविस्तर जाणून घ्या.

Laptop
Bestseller Phone: 'हा' आहे भारतातील सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन, किंमत-फीचर्सने ग्राहकांना लावले वेड

Shift + Ctrl + T

Shift + Ctrl + T शॉर्टकट गुगल क्रोमसाठी खूपच उपयोगी आहे. याच्या मदतीने डिलीट करण्यात आलेले टॅब परत रिकव्हर करता येतात. अनेकदा आपण घाईघाईत महत्त्वाचे टॅब कट करतो. अशावेळी हिस्ट्रीच्या मदतीने टॅब परत रिकव्हर करता येतात. परंतु, तुम्ही Shift + Ctrl + T चा वापर करून मिनिटात टॅब परत मिळवू शकता.

Window + Shift + S

या शॉर्टकटचा वापर स्क्रीनशॉटसाठी होतो. Window + Shift + S चा वापर करून तुम्ही स्क्रीनवरील कोणत्याही भागाचा स्क्रीनशॉट काढू शकता. म्हणजेच केवळ Window + Shift + S बटन प्रेस करून स्क्रीनशॉट काढता येईल.

Window + D

Window + D च्या मदतीने लॅपटॉपवर सुरू असलेल्या विंडोजला एकाचवेळी मिनिमाइज करता येईल. एकाचवेळी अनेक विंडोज ओपन असतील, अशावेळी या शॉर्टकट की चा खूपच उपयोग होईल. Window + D ऐवजी Window + M चा देखील वापर करू शकता.

हेही वाचा: Smartphone Offer: Redmi च्या बेस्टसेलर फोनवर बंपर डिस्काउंट, १०४९ रुपयात करा खरेदी, इयरफोन्स फ्री

Window + L

सुरक्षेच्या दृष्टीने Window + L शॉर्टकट की उपयोगी येईल. तुम्ही एका क्लिकमध्ये लॅपटॉपला लॉक करू शकता. तुम्हाला जर अचानक लॅपटॉप बंद करायचा असल्यास अशावेळी या शॉर्टकट की चा वापर करता येईल.

Window + alt + R

Window + alt + R देखील खूपच कामाची शॉर्टकट की आहे. याच्या मदतीने तुम्ही लॅपटॉपच्या स्क्रीनला रेकॉर्ड करू शकता. एकदा Window + alt + R की प्रेस केल्यास आपोआप स्क्रीन रेकॉर्ड होईल. लॅपटॉपवर व्हीडिओ रेकॉर्ड करण्यासाठी याचा वापर करता येईल.

हेही वाचा: द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur electoral roll revision 2026
Parbhani SIR
Gokul election voter list 2026 in Kolhapur
18 Million Voter Names May Be Missing From Maharashtra Draft Roll as Special Electoral Revision Nears August 24
Marathi News Esakal
www.esakal.com