

Top 10 Selling Cars : देशांतर्गत ऑटोमोबाईल मार्केट पुन्हा तेजीत आहे. यावेळी देशात एसयूव्ही कारची क्रेझ पाहायला मिळते. पण हॅच बॅक कार विक्रीच्या बाबतीत पुढे आहेत. गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2023 मध्ये देशात 1,51,448 कार विकल्या गेल्या होत्या. ज्यामध्ये सर्वाधिक वाहने मारुती सुझुकीची होती.
फेब्रुवारी 2023 मध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या टॉप 10 कार-
फेब्रुवारीमध्ये विकल्या गेलेल्या कारमध्ये मारुती बलेनो पहिल्या क्रमांकावर होती. गेल्या महिन्यात कंपनीला या कारच्या 18,592 युनिट्सची विक्री करता आली. गेल्या वर्षी या कारच्या 12,570 युनिट्सची विक्री झाली होती.
त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक विक्री होणारी कार मारुती स्विफ्ट होती. या कारचे 18,422 युनिट्स विकले गेले.
तिसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी अल्टो ही सर्वाधिक विक्री होणारी कार होती. या कारच्या 18,114 युनिट्सची विक्री करण्यात कंपनीला यश आले. नुकत्याच लाँच झालेल्या अल्टो फेसलिफ्टलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
चौथ्या क्रमांकावर सर्वाधिक विक्री होणारी कार मारुती वॅगन-आर आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये, कंपनीला 16,889 युनिट्सची विक्री करण्यात यश आले.
मारुतीची स्वतःची सेडान कार मारुती स्विफ्ट डिझायर पाचव्या क्रमांकावर आहे. फेब्रुवारीमध्ये कंपनीला या कारच्या 16,798 युनिट्सची विक्री करता आली. (Car)
गेल्या महिन्यात सहाव्या क्रमांकावर मारुतीची ब्रेझा सर्वाधिक विक्री होणारी कार होती. कंपनीने या कारच्या 15,787 युनिट्सची विक्री केली.
फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये टाटा नेक्सॉन एसयूव्ही कार सातव्या क्रमांकावर होती. त्यातील 13914 युनिट्सची विक्री करण्यात कंपनीला यश आले.
मारुती सुझुकीची MPV कार Eeco पुन्हा आठव्या क्रमांकावर आली आणि कंपनीने 11,352 युनिट्स विकल्या. (Automobile)
टाटाच्या आणखी एका कारने फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये स्थान मिळवले आणि 11,169 युनिट्सच्या विक्रीसह टाटा पंच नवव्या क्रमांकावर राहिली.
दुसरीकडे, ह्युंदाईची सर्वाधिक मागणी असलेली कार Hyundai Creta ही टॉप टेन सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये शेवटच्या क्रमांकावर राहिली. या कारच्या 10,421 युनिट्सची विक्री करण्यात कंपनीला यश आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.