‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ सज्ज; जलद गतीने होणार ऑक्सिजन सिलेंडर्सची वाहतूक

१०० वाहने सेवेत दाखल
‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ सज्ज; जलद गतीने होणार ऑक्सिजन सिलेंडर्सची वाहतूक

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा देशावर बराच विपरित परिणाम झाला आहे. या लाटेमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. परिणामी, वाढत्या रुग्णसंख्येमुळे अनेक कोविड सेंटर, रुग्णालये येथे बेड, ऑक्सिजन सिलेंडर यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता निर्माण झाली. त्यामुळेच प्रसिद्ध अशा महेंद्रा समुहाकडून ‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ (ओटुडब्ल्यू) (oxygen-on-wheels) हा मोफत सेवा उपक्रम लाँच करण्यात आला आहे. या उपक्रमाअंर्तगत ऑक्सिजनची (oxygen) नितांत गरज असलेल्या रुग्णालये व कोविड सेंटरवर ऑक्सिजनची सेवा पुरवणार आहेत. (mahindra logistics offers oxygen on wheels connecting producers to hospitals)

ओटुडब्ल्यूचा हा उपक्रम मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी- चिंचवड, चाकण, नाशिक आणि नागपूरमध्ये राबवण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच टप्प्यात 100 वाहनांसह ही सेवा सुरु झाली आहे. ही मोफत सेवा इतर शहरांसोबतच प्रामुख्याने दिल्लीला पुरवली जाणार आहे. दिल्लीतील ऑक्सिजनचा गंभीर तुडवडा लक्षात घेता नागरी प्रशासन आणि सरकारी विभागांशी याविषयी चर्चा सुरू आहे. या उपक्रमाला गेल्या 48 तासांत मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद लक्षात घेता थेट रुग्णाच्या घरी ऑक्सिजन सिलेंडर पुरवण्यापर्यंत या उपक्रमाचा विस्तार करण्याची योजना विचाराधीन आहे.

‘ऑक्सिजन ऑन व्हील्स’ सज्ज; जलद गतीने होणार ऑक्सिजन सिलेंडर्सची वाहतूक
कचरा गोळा करणा-या भावांचं गाणं ऐकलं, आनंद महिंद्रा पडले प्रेमात

ओटुडबल्यूचे कामकाज महिंद्रा लॉजिस्टिक्स (mahindra logistics) या महिंद्रा समूहाच्या कंपनीद्वारे हाताळले जाणार असून कंपनीने या प्रकल्पासाठी प्रशासन व स्थानिक सरकारी संघटनांशी करार केला आहे. वाहनांचा मोठा ताफा, सर्वसमावेशक आदेश आणि नियंत्रण केंद्र यांच्या मदतीने महिंद्रा लॉजिस्टिक्स जीवरक्षक ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी विनाअडथळा आणि अखंडित पुरवठा साखळी तयार करत आहे. या ऑक्सिजनची हॉस्पिटल व वैद्यकीय केंद्रांना सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने वाहतूक केली जाणार आहे.

‘आमचे स्त्रोत आणि क्षमतांचा नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर करून या आव्हानाचा सामना करणं हे आमचं कर्तव्य आहे. ऑक्सिजन ऑन व्हील्स स्थानिक प्रशासनासोबत भागिदारी करून तातडीची ऑक्सिजनची (oxygen) गरज पूर्ण करण्यावर आमचा भर असेल. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होईल,सोबतच आरोग्य यंत्रांवर येणारा भारदेखील कमी होईल असं महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश शहा म्हणाले.

महिंद्रा लॉजिस्टिक्सविषयी

महिंद्रा लॉजिस्टिक लिमिटेड (एमएलएल) ही थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स (थ्रीपीएल) सेवा पुरवठादार असून पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि नागरी वाहतूक सेवा तिचे कौशल्य आहेत. एक दशकापूर्वी स्थापन झालेली एमएलएल वाहन, अभियांत्रिकी, ग्राहक उत्पादने आणि ई- कॉमर्ससारख्या क्षेत्रातील 400 कॉर्पोरेट ग्राहकांना सेवा देते. कंपनीने असेट- लाइट हे व्यावसायिक प्रारूप अवलंबले असून त्याद्वारे पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि नागरी वाहतूक सेवेशी संबंधित गरजेनुसार आणि तंत्रज्ञानावर आधारित सेवा पुरवल्या जातात. एमएलएल ही महिंद्रा समूहाच्या मोबिलिटी सेवा विभागाचा भाग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com