
Mangalyaan 2 : चांद्रयानं २ च्या यशानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो मंगळयान २ च्या तयारीत आहे. याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. त्यानुसार, या मोहिमेची तारखी, उद्देश आणि यासाठी वापरण्यात येणारं नवं तंत्रज्ञान याबाबत माहिती देण्यात आली आहे. टाइम्सनाऊनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Mangalyaan 2 after nine years ISRO prepares for next mangal mission important update has arrived)
माध्यमातील वृत्तानुसार, इस्रो लवकरच मंगळाच्या अभ्यासासाठी दुसरी मोहिम लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. इस्रोनं आपल्या पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत आपलं यान यशस्वीरित्या स्थापित केलं होतं. त्यानंतर तब्बल ९ वर्षांनंतर आता दुसऱ्या मंगळ मोहिमेची तयारी इस्रो करत आहे. (Latest Marathi News)
मंगळ ग्रहाच्या अभ्यासासाठी आखण्यात येत असलेल्या दुसऱ्या मोहिमेचं नाव 'मार्स ऑर्बिटर मिशन २' अर्थात 'मंगळयान २' असं आहे. या मोहिमेची जोरदार तयारी सुरु असली तरी अद्याप याच्या लॉन्चची निश्चित तारीख कळू शकलेली नाही. पण लवकरच याची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. (Marathi Tajya Batmya)
मंगळयान २ चार पेलोड्स अंतराळात नेणार आहे. त्याद्वारे मंगळावरील धूळ, मंगळावरील वातावरण आणि पर्यावरणासह इतर पैलूंचा अभ्यास केला जाईल. हे सर्व पेलोड्स सध्या विकासीत केले जात असून ते विकासाच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत, इस्रोच्या एका अधिकाऱ्यानं याबाबत माहिती दिली आहे. (Latest Marathi News)
पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (PSLV-C25) या रॉकेटद्वारे ५ नोव्हेंबर २०१३ रोजी मंगळयान मोहीम लॉन्च करण्यात आली होती. २४ सप्टेंबर २०२४ रोजी ही मोहीम यशस्वी ठरली होती. मंगळ ग्रहाच्या कक्षेत भारतानं पहिल्याच प्रयत्न आपलं यान प्रस्थापित केलं होतं.
यामुळं मंगळाच्या कक्षेत यान पाठवणारा भारत जगात चौथा देश ठरला होता. तर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरलेला पहिलाच देश होता. या यानानं पाच पेलोड्स आपल्यासोबत नेले होते. याद्वारे ग्रहाचा पृष्ठभाग, आकारमान, खनिजं आणि वातावरण आदींचा अभ्यास केला होता.