Instagram Algorithm Update India : इन्स्टाग्रामवर आता अश्लील आणि हिंसक कंटेंट दिसणार नाही? मेटाचा भारतात मोठा निर्णय

भारतातील युजर्ससाठी इन्स्टाग्रामच्या रिकमेंडेशन सिस्टिममध्ये एआय (AI) आधारित मोठे बदल; तक्रारींमध्ये एका वर्षात ५० टक्के घट झाल्याचा मेटाचा दावा
Major change by Meta in Instagram's recommendation system

Major change by Meta in Instagram's recommendation system

Sakal

Updated on: 

सोशल मीडिया कंपनी 'मेटा'ने (Meta) भारतातील इन्स्टाग्राम युजर्ससाठी आपल्या 'रिकमेंडेशन सिस्टिम'मध्ये (Recommendation Systems) मोठा बदल केला आहे. नव्या प्रणालीनुसार, आता भारतीय युजर्सच्या फीड, रील्स आणि एक्सप्लोर विभागात लैंगिकदृष्ट्या सूचक (Sexually Suggestive) आणि हिंसाचार दर्शवणारा कंटेंट मोठ्या प्रमाणात रोखला जाईल. मंगळवारी (१७ नोव्हेंबर २०२६) जारी केलेल्या निवेदनात मेटाने म्हटले आहे की, या बदलांमुळे भारतात युजर्सकडून कंटेंट रिपोर्ट करण्याचे प्रमाण एका वर्षापूर्वीच्या तुलनेत निम्म्यावर म्हणजेच सुमारे ५० टक्क्यांनी घटले आहे.

Loading content, please wait...