Micromax In Note 2 : 48MP कॅमेरा अन् 30W फास्ट चार्जिंगसह लॉन्च

Micromax In Note 2
Micromax In Note 2

Micromax In Note 2 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. या नवीन मायक्रोमॅक्स फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि 20:9 AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून फोनमध्ये सेल्फीसाठी होल-पंच डिझाइन दिले आहे. Micromax In Note 2 मध्ये ग्राहकांना Octa-core MediaTek Helio G95 प्रोसेसर देण्यात आले असून यामध्ये दोन कलर ऑप्शन्स देखील मिळत आहेत. Micromax In Note 2 ची स्पार्धा थेट Samsung Galaxy M21 2021 Edition, Motorola Moto G31 आणि Realme 8i सारख्या स्मार्टफोनशी होईल.

Micromax In Note 2 ची भारतात किंमत, लॉन्च ऑफर

Micromax In Note 2 ची भारतात किंमत 13,490 रुपयांपासून सुरू होते. ही किंमत फोनच्या 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंटची आहे. तसेच Micromax In Note 2 ब्लॅक आणि ब्राऊन कलर ऑप्शन्समध्ये बाजारात सादर करण्यात आला आहे. त्याची विक्री 30 जानेवारीपासून सुरू होणार आहे. दुपारी 12 वाजल्यापासून हा फोन फ्लिपकार्ट आणि Micromaxinfo.com वेबसाइटवरून खरेदी करता येईल. ऑफरबद्दल बोलायचे तर, फोन मर्यादित काळासाठी 12,490 रुपयांच्या सवलतीच्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Micromax In Note 2
देशातील 5 सर्वात स्वस्त CNG कार; देतात 31KM पर्यंत मायलेज

Micromax In Note 2 चे फीचर्स

नोट 2 मधील ड्युअल-सिम (नॅनो) मायक्रोमॅक्स इन नोट 2 Android 11 वर चालतो. तसेच यामध्ये 6.43-इंच फुल-एचडी+ (1,080x2,400 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले दिला आहे ज्याला 20:9 अस्पेक्ट रेशो आणि 550 nits ब्राइटनेस मिळते. फोनमध्ये गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे. याशिवाय, फोन MediaTek Helio G95 प्रोसेसरसह 4 GB रॅमसह सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 5-मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स, 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

Micromax In Note 2
कोरोना काळात PF खात्यातील पैसे हवेत? घरी बसून होईल काम; पाहा प्रोसेस

फोनचे स्टोरेज 64 जीबी आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 256 जीबीपर्यंत वाढवता येते. कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये 4G LTE, Wi-Fi 802.11ac, Bluetooth v5.0, GPS/A-GPS, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक यांचा समावेश आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

तसेच फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी आहे, ज्यामध्ये 30 W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. फोनची बॅटरी 25 मिनिटांत 50 टक्के चार्ज होते. फोनचे डायमेंशन 159.9x74.3x8.34mm आणि वजन 205 ग्रॅम आहे.

Micromax In Note 2
फक्त फोन सुरु ठेवायचाय? हे आहेत Jio, Airtel अन् Vi चे बेस्ट प्लॅन्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com