Microsoft New Keyboard : तब्बल 30 वर्षांनंतर मायक्रोसॉफ्टने केला कीबोर्डमध्ये बदल; कसं आहे नवीन डिझाईन?

सध्या हा बदल मायक्रोसॉफ्टच्या विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या काही ठराविक पर्सनल कम्प्युटरमध्ये दिसणार आहे.
Microsoft New Keyboard
Microsoft New KeyboardeSakal

मायक्रोसॉफ्ट कंपनीने तब्बल 30 वर्षांनंतर आपल्या कम्प्युटरच्या कीबोर्डमध्ये बदल केला आहे. 'कोपायलट' या आपल्या एआय टूलला लाँच करण्यासोबतच कंपनीने हा नवीन कीबोर्ड सादर केला आहे. यूजर्सचा कम्प्युटर वापरण्याचा अनुभव अधिक चांगला व्हावा यासाठी हा निर्णय घेतला आहे.

कसा आहे नवीन कीबोर्ड

नव्या कीबोर्डमध्ये उजव्या बाजूला असणाऱ्या विंडोज बटणाऐवजी 'कोपायलट' हे बटण असणार आहे. अर्थात, ओईएम (ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफ्रॅक्चरर) (Original Equipment Manufacturer) मध्ये आणि इतर मार्केटमध्ये याची जागा वेगळी असणार आहे.

सध्या हा बदल मायक्रोसॉफ्टच्या विंडोज 11 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या काही ठराविक पर्सनल कम्प्युटरमध्ये दिसणार आहे. 1994 साली मायक्रोसॉफ्टने पहिल्यांदा विंडोज बटण सादर केलं होतं. यानंतर आता तब्बल 30 वर्षांनी कीबोर्ड लेआऊटमध्ये बदल करण्यात आला आहे.

अधिकृत घोषणा

या नव्या बटणाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. CES टेक्नॉलॉजी कॉन्फरन्समध्ये हा नवा कीबोर्ड सादर करण्यात येणार आहे. दैनिक भास्करने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Official announcement)

Microsoft New Keyboard
Copilot AI App : मायक्रोसॉफ्टने अँड्रॉईड यूजर्ससाठी लाँच केलं एआय अ‍ॅप; मोफत तयार करता येणार फोटो

मायक्रोसॉफ्टने काही दिवसांपूर्वीच आपल्या कोपायलेट या एआय टूलचं अँड्रॉईड आणि आयओएस अ‍ॅप लाँच केलं होतं. या अ‍ॅपमध्ये चॅटजीपीप्रमाणे प्रश्न विचारता येऊ शकतात. तसंच, जेनरेटिव्ह इमेजेस आणि एआय गाणीही तयार करता येऊ शकतात. अ‍ॅप व्यतिरिक्त तुम्ही वेबसाईटवर जाऊनही हे एआय टूल वापरू शकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com