Copilot AI App : मायक्रोसॉफ्टने अँड्रॉईड यूजर्ससाठी लाँच केलं एआय अ‍ॅप; मोफत तयार करता येणार फोटो

मायक्रोसॉफ्टने केम्ब्रिजमध्ये असणाऱ्या एका म्युझिक स्टार्टअप कंपनीसोबत पार्टनरशिप केली आहे. यामुळे कोपायलट चॅटबॉटमध्ये आता एआय गाणीही बनवता येणार आहेत.
Copilot AI App
Copilot AI AppeSakal

Microsoft Copilot Android App : जगातील मोठमोठ्या टेक कंपन्या सध्या एआयमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. आता मायक्रोसॉफ्टने देखील आपल्या कोपायलट या एआय टूलचं अँड्रॉईड अ‍ॅप लाँच केलं आहे. हे अ‍ॅप चॅटजीपीटी (ChatGPT) प्रमाणेच यूजर्सच्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतं. मात्र सोबतच फोटो जनरेट करण्याचं फीचरही यात मोफत देण्यात आलं आहे.

मायक्रोसॉफ्टने आपल्या बिंग चॅट (Bing Chat) या टूलचं रिब्रँडिंग करून त्याला कोपायलट (Copilot) नाव दिलं होतं. हे चॅटजीपीटी या एआय टूलप्रमाणेच यूजर्सना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देतं. यामध्ये जीपीटी-4 ही सुविधा देखील मिळते. विशेष म्हणजे, ओपन एआयच्या चॅटजीपीटीमध्ये GPT-4 ही सुविधा सबस्क्रिप्शन असलेल्या यूजर्सनाच देण्यात आली आहे. मात्र, कोपायलटमध्ये हे फीचर मोफत दिलं आहे. (Microsoft Copilot)

Copilot AI App
Humane AI Pin : तुमच्या हाताची होणार स्क्रीन, खिशाला अडकवता येणार कम्प्युटर; पुढील वर्षीपासून मिळणार डिलिव्हरी

इमेज अन् गाणी

एआय इमेज जनरेशनसाठी (AI image Generation) देखील कोपायलेट अ‍ॅप वापरता येऊ शकतं. यासाठी हे DALL-E3 इमेज जनरेटरचा वापर करतं. यासोबतच, यामध्ये ई-मेल किंवा डॉक्युमेंटसाठी ड्राफ्ट तयार करणे आणि इतर गोष्टीही करता येतात.

मायक्रोसॉफ्टने केम्ब्रिजमध्ये असणाऱ्या एका म्युझिक स्टार्टअप कंपनीसोबत पार्टनरशिप केली आहे. यामुळे कोपायलट चॅटबॉटमध्ये आता एआय गाणीही बनवता येणार आहेत. (Microsoft AI tool)

Copilot AI App
AI Death Prediction : तुमचा मृत्यू कधी होणार हेदेखील सांगणार 'एआय'; डेन्मार्कमधील टेक्निकल युनिवर्सिटीचा शोध

असा करा वापर

यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी प्लेस्टोअरवर (Play Store) जाऊन कोपायलट हे अ‍ॅप डाऊनलोड करावं लागणार आहे. यानंतर मायक्रोसॉफ्ट अकाउंट किंवा मोबाईल नंबरच्या मदतीने लॉग-इन करावं लागेल. यानंतर तुम्ही हव्या त्या कमांड देऊन इमेज किंवा साँग जनरेट करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com