
आतापर्यंत 50 लाखहून अधिक लोकांनी मित्रों अॅप डाउनलोड केले आहे. 2 जून रोजी हे अॅप प्ले-स्टोअरवरुन हटवण्यात आले होते. प्रसारमाध्यमातील एका वृत्तानुसार संबंधित अॅपचे उगमस्थान हे पाकिस्तानधील असल्याचा दावा करण्यात आला होता.
मुंबई : अगदी अल्पावधीत लोकप्रिय झालेले शॉर्ट व्हिडिओचं व्यासपीठ असलेले मित्रों अॅप पुन्हा गुगल प्ले स्टोअरवर आलं आहे. कंटेंट पॉलिसी उल्लंघनामुळे प्ले-स्टोअरवरुन हे अॅप हटवण्यात आले होते. सुरुवातीला अॅपची कोणतीही प्रायवेसी पॉलिसीही नव्हती आता या नव्या अपडेट्ससोबत हे अॅप उपलब्ध झाले आहे. आतापर्यंत 50 लाखहून अधिक लोकांनी मित्रों अॅप डाउनलोड केले आहे. 2 जून रोजी हे अॅप प्ले-स्टोअरवरुन हटवण्यात आले होते. प्रसारमाध्यमातील एका वृत्तानुसार संबंधित अॅपचे उगमस्थान हे पाकिस्तानधील असल्याचा दावा करण्यात आला होता. या अॅपचे मूळ नाव TicTic असून पाकिस्तानी डेव्हलपर्सकडून अॅप खरेदी करण्यात आल्याचा उल्लेखही वृत्तामध्ये करण्यात आला होता.
.. म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले इराणचे आभार
एंड्रॉयड आणि गुगल प्लेचे के उपाध्यक्ष समीर सामत यांनी यासंदर्भात म्हटले होते की, तांत्रिक त्रूटीच्या पार्श्वभूमीवर आम्ही एक व्हिडिओ अॅप हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्रूटीसंदर्भात डेव्हलपर्स काम करत असून लवकरच अॅपचा पुन्हा स्टोअरमध्य समाविष्ट करण्यास प्रयत्नशील आहोत. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार नेटकऱ्यांना पुन्हा एकदा मित्रों अॅपचा वापर करणे शक्य होणार आहे. मित्रों अॅप आणि त्यातील फीचर्स टिकटॉकप्रमाणेच आहेत. एका बाजूला चायनिज अॅप डिलिट करण्याची लाट आली असताना स्वदेशाच्या मुद्यावरुन मित्रों अॅप डाउनलोड करण्याचा सपाटाच लागल्याचे चित्र निर्माण झाले होते. Mitron App च्या माध्यमातून कंटेंट नियमावलीचे उल्लंघन करण्याचा ठपकाही ठेवण्यात आला होता.
पाकिस्तानकडून पुन्हा नापाक कृत्य ; भारतीय राजदूतांना धमकावण्याचा प्रयत्न
देशात टिकटॉकविरोधात मोहिम सुरु झाल्यानंतर अचानक मित्रों अॅप व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. 50 लाखहून अधिक लोकांनी हे अॅप डाउनलोड केल्यानंतर या अॅपचे पाकिस्तान कनेक्शन समोर आले होते. मित्रों अॅपवर कंटेट चोरीचाही आरोप होता. गुगल कंटेंट पॉलिसीनुसार कोणत्याही इतर अॅपवरुन दुसऱ्या अॅपवर कंटेंट टाकणे चोरी नियमबाह्य आहे.