फक्त 2 रुपयांत मिळणार 1 GB डेटा, फ्री कॉलिंग आणि भरपूर फायदे असणारा खास प्लॅन

Smartphone main.png
Smartphone main.png

नवी दिल्ली- टेलिकॉम कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे टिकवून ठेवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करताना दिसतात. रिचार्ज प्लॅनमध्ये कपंन्या सातत्याने नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत आहेत. नुकताच रिलायन्स जियोने आपल्या रिचार्ज प्लॅन्समध्ये सर्व नेटवर्कवर कॉलिंग फ्री केले आहे. जर तुमच्याकडून डेटा जास्त वापरला जात असेल आणि तुम्ही चांगल्या प्लॅनच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला अशा एक स्वस्त आणि मस्त प्लॅनबाबत सांगत आहोत. यामध्ये तुम्हाला फक्त 2 रुपयांत 1 जीबी डेटा मिळेल. त्याचबरोबर इतर अनेक बेनिफि्टसही मिळतील. जाणून घेऊयात हे प्लॅन कोणते आहेत आणि यातून काय-काय फायदे मिळणार. 

केवळ 2 रुपयांत 1 जीबी डेटा देणारे प्लॅन
हा व्होडाफोन-आयडियाचा (VI) 449 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 56 दिवसांची आहे. डबल डेटा ऑफरअंतर्गत व्होडाफोन-आयडियाच्या या प्लॅनमध्ये दररोज 4 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच, प्लॅनमध्ये एकूण 224 जीबी डेटा ग्राहकांना मिळतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला 1 जीबी डेटा केवळ 2 रुपयांना पडतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये 1 जीबी डेटा सर्वात स्वस्त आहे.

व्होडाफोन-आयडियाच्या या प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचाही फायदा मिळतो. प्लॅनमध्ये दररोज तुम्हाला 100 एसएमएसची सुविधा मिळते. त्याचबरोबर Vi Movies आणि TV चे ऍक्सेसही फ्रीमध्ये मिळते. प्लॅनमध्ये वीकेंड डेटा रोल ओव्हरचेही बेनिफिट्स मिळतात. 

या प्लॅनमध्ये 2.08 रुपयांना मिळतो 1 जीबी डेटा
व्होडाफोन-आयडियाचा आणखी एक दुसरा चांगला प्लॅन आहे. हा प्लॅन 699 रुपयांचा आहे. यामध्ये 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. कंपनीच्या या प्लॅनमध्ये एकूण 336 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच या प्लॅनमध्ये 1 जीबी डेटा तुम्हाला 2.08 रुपयांना पडतो. प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगबरोबर दररोज 100 एसएमएस, Vi Movies आणि TV चा ऍक्सेस फ्रीमध्ये मिळतो. त्याचबरोबर वीकेंड डेटा रोलओव्हरचाही फायदा मिळतो. 

जियो आणि एअरटेलच्या प्लॅनमध्ये 1 जीबी डेटाची किंमत काय
जर व्होडाफोन-आयडियाच्या 56 दिवसांच्या प्लॅनची तुलना केल्यास रिलायन्सकडे 56 दिवसांसाठी 2 प्लॅन आहेत. जियोचा पहिला प्लॅन 399 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये एकूण 84 जीबी डेटा मिळतो. म्हणजेच प्लॅनमध्ये 1 जीबी डेटा यूजर्सला 4.75 रुपयांना पडतो. तर रिलायन्स जियोच्या 56 दिवसांची व्हॅलिडिटी असलेला दुसरा प्लॅन 444 रुपयांचा आहे. जियोच्या या प्लॅनमध्ये एकूण 112 जीबी डेटा मिळतो. त्यानुसार या प्लॅनमध्ये 1 जीबी डेटा ग्राहकाला 3.96 रुपयांना मिळतो. 

56 दिवसांच्या एअरटेलच्या प्लॅनमध्ये 3.32 रुपयाला 1 जीबी  
एअरटेलकडे 56 दिवसांच्या व्हॅलिडिटीचे अनेक प्लॅन्स आहेत. 399 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी 56 दिवसांची आहे. या प्लॅनमद्ये एकूण 84 जीबी डेटा मिळतो. प्लॅनमध्ये 1 जीबी डेटा तुम्हाला 4.75 रुपयांना पडतो. 56 दिवसांची व्हॅलिडिटीचा एअरटेलचा दुसरा प्लॅन हा 449 रुपयांचा आहे. या प्लॅनमध्ये एकूण 112 जीबी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये 1 जीबी डेटा ग्राहकांना 4 रुपयांना मिळतो. एअरटेलचा एक प्लॅन 558 रुपयांचा आहे. यामध्ये 168 जीबी डेटा मिळतो. त्यानुसार एक जीबी डेटा 3.32 रुपयांना मिळतो. तर 599 रुपयांच्या दुसऱ्या प्लॅनमध्ये 112 जीबी डेटा मिळतो. यामध्ये 1 जीबी डेटा हा 5.34 रुपयांना मिळतो. या सर्व प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसह इतरही बेनिफिट्स मिळतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com