Cheap Internet Countries: जगातील सर्वात स्वस्त डेटा मिळणाऱ्या देशांमध्ये भारत तिसरा! अमेरिका-चीनपेक्षाही कमी आहे किंमत

Worlds Cheap Internet Countries List: इस्त्राईलमध्ये जगात सर्वात स्वस्त इंटरनेट उपलब्ध आहे.
Cheap Internet Countries
Cheap Internet CountriesEsakal
Updated on

Worlds Cheap Internet Countries List: देशात गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेट डेटाची किंमत बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. विशेषतः २०१६ साली आलेल्या जिओ सिमच्या धमाक्यानंतर तर हे दर आणखी घसरले होते.

नुकत्याच जाहीर झालेल्या एका आकडेवारीनुसार, स्वस्त डेटा देणाऱ्या देशांमध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने विविध देशांमधील इंटरनेटबाबत माहिती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये कोणत्या देशात इंटरनेटची (Mobile Data) किती किंमत आहे, किती वापरकर्ते आहेत, आणि किती प्रमाणात इंटरनेट सबस्क्रायबर्स आहेत याबाबत देखील माहिती देण्यात आली आहे.

भारतात इंटरनेट स्वस्त

जगात सर्वात स्वस्त इंटरनेट (Mobile data in India) देणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात एक जीबी डेटाची किंमत ०.१७ डॉलर्स, म्हणजेच १३.९८ रुपये आहे. २०२२ साली या यादीमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर होता, यावर्षी देशातील इंटरनेट आणखी स्वस्त झाले आहे.

Cheap Internet Countries
Tech Hacks : गुगल चोरू शकणार नाही तुमचा डेटा, अकाउंटमध्ये करा फक्त 'ही' सेटिंग

या यादीमध्ये भारताच्या (Data cost in India) वर इटली आणि इस्त्राईलचा क्रमांक लागतो. इस्त्राईलमध्ये जगात सर्वात स्वस्त इंटरनेट उपलब्ध आहे. या देशात एक जीबी डेटासाठी अवघे ३.२९ रुपये मोजावे लागतात. तर, इटलीमध्ये केवळ दहा रुपयांना सुमारे एक जीबी डेटा उपलब्ध आहे.

इतर देशांची काय स्थिती?

अमेरिका, चीन, ब्रिटन, सौदी अरेबिया, जपान, स्वीडन, दक्षिण कोरिया अशा मोठमोठ्या देशांमध्ये इंटरनेट हे भारतापेक्षा महाग आहे. पाकिस्तानात एक जीबी डेटासाठी ०.३६ डॉलर्स एवढी किंमत मोजावी लागते. तर बांगलादेशमध्ये ०.३२ डॉलर्सना एक जीबी डेटा उपलब्ध आहे.

यापाठोपाठ या यादीमध्ये चीन (०.४१ डॉलर्स), रशिया (०.४८ डॉलर्स), ऑस्ट्रेलिया (०.५७ डॉलर्स), स्पेन (०.६० डॉलर्स), ब्रिटन (०.७९ डॉलर्स), सौदी अरेबिया (१.५२ डॉलर्स), दक्षिण आफ्रिका (२.०४ डॉलर्स), जपान (३.८५ डॉलर्स), अमेरिका (५.६२ डॉलर्स) आणि दक्षिण कोरिया (१२.५५ डॉलर्स) या देशांचा क्रमांक लागतो.

सर्वात महाग इंटरनेट कुठे?

जगातील सर्वात महाग इंटरनेट (Costliest internet rates) दर हे फॉकलंड आयलंड या देशामध्ये आहेत. याठिकाणी एक जीबी इंटरनेट डेटाची किंमत तब्बल ३८.४५ डॉलर्स एवढी आहे.

म्हणजेच, एक जीबी डेटासाठी याठिकाणी तब्बल ३,१७२ रुपये एवढी रक्कम मोजावी लागते. ही रक्कम भारतापेक्षा २२६ पटींनी जास्त आहे.

Cheap Internet Countries
Mobile Hacks: आता मित्रांशी फोनवर बोला फ्री मध्ये, ना इंटरनेट लागणार ना रिचार्ज!

यूझर्सची संख्या कमी

सर्वात स्वस्त इंटरनेट असले, तरी इंटरनेट वापरण्यात भारत अजून मागेच आहे. देशातील ५० टक्क्यांहून अधिक लोक इंटरनेट वापरत नसल्याचं या आकडेवारीतून समोर आलं आहे.

सर्वात कमी इंटरनेट वापरणाऱ्या देशांमध्ये भारत ११व्या क्रमांकावर आहे. देशातील ४३ टक्के नागरिक इंटरनेट वापरत असल्याचं यात म्हटलं आहे.

या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर इरिट्रिया देश आहे, ज्यातील केवळ १ टक्का नागरिक इंटरनेट वापरतात.

त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर सोमालिया (२ टक्के) आणि तिसऱ्या क्रमांकावर युगांडाची (६ टक्के) वर्णी आहे. आईसलँड, यूएई आणि सौदी अरेबिया या देशांमधील १०० टक्के नागरिक इंटरनेट वापरतात असंही यात म्हटलं आहे.

Cheap Internet Countries
Internet Speed : तुमच्या Internet ची सरकारला काळजी; फिक्स केलं Broadband Speed

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com