esakal | मोबाईल वापरातही मुलगा-मुलगी भेद; कुटुंबांची मानसिकता संतापजनक
sakal

बोलून बातमी शोधा

girl access mobile survey

प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसत असले तरी त्याचा वापर होत असताना स्त्री आणि पुरुषांमध्ये त्याचा वापर करण्यात महिला, मुली मात्र मागे असल्याचं दिसतं. 

मोबाईल वापरातही मुलगा-मुलगी भेद; कुटुंबांची मानसिकता संतापजनक

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - डिजिटल जमान्यात आपण नवनवीन तंत्रज्ञान हाताळत आहोत. रोज बाजारात काही ना काही नवीन अपडेट येत आहेत. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसत असले तरी त्याचा वापर होत असताना स्त्री आणि पुरुषांमध्ये त्याचा वापर करण्यात महिला, मुली मात्र मागे असल्याचं दिसतं. याबाबत आता नवा सर्व्हे समोर आला आहे.

42 टक्के मुलींना त्यांच्या घरी दिवसभरात सरासरी एक तासापेक्षा कमी काळ मोबाइल फोन वापरण्यासाठी परवानगी दिली जाते. याचं कारण म्हणजे त्यांच्या पालकांना ते असुरक्षित वाटतं. सेंटर फॉर कॅटालायझिंग चेंज या नवी दिल्लीतील एनजीओने डिजिटल एम्पॉवरमेंट फाउंडेशनच्या सहाय्याने हा सर्व्हे केला. यामध्ये 10 राज्यातील 29 जिल्ह्यात हा सर्व्हे घेण्यात आला. भारतातील मुलींना डिजिटल अॅक्सेस किती मिळतो हे समजण्यासाठी हा सर्व्हे घेण्यात आला होता. 

दहा राज्यात झाला सर्व्हे
राष्ट्रीय मुलगी दिनाच्या पार्श्वभूमीवर हा सर्व्हे प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये चार जणांची मते घेण्यात आली होती. त्यात मुली, कुटुंबातील सदस्य, शिक्षक आणि दहा राज्यातील काही एनजीओंचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. दहा राज्यांमध्ये आसाम, हरियाणा, कर्नाटक, बिहार, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडु, तेलंगना, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये हा सर्व्हे केला गेला. 

हे वाचा - 'तुम्हाला हे शोभत नाही'; PM मोदींच्या व्यासपीठावर जय श्रीराम ऐकताच ममतादीदी भडकल्या

प्रत्येक राज्यात वेगवेगळं प्रमाण
राज्यानुसार मुलींना मोबाइल वापरासाठी मिळणारा काळ हा वेगवेगळा आहे. कर्नाटकात मुलींना सर्वाधिक मोबाइल वापरण्यासाठी मिळतो. याठिकाणी हे प्रमाण 65 टक्के इतकं आहे. मुलांना डिजिटल अॅक्सेस सहज आहे. तर हरियाणात स्त्री पुरुष गुणोत्तरात मोठा फरक आहे. तेलंगणातही हा फरक दिसून येतो. तिथं 12 टक्के मुलींना डिजिटल अॅक्सेस सहज मिळतो असं या सर्व्हेमध्ये समोर आलंय.

कुटुंबाची मानसिकता ठरतेय अडथळा
सर्व्हेमधून अशीही माहिती समोर आली की, कुटुंबाची मानसिकता आणि पूर्वग्रह यामुळे मुलींना मोबाइल जास्त वेळ देण्यापासून रोखतं. अशा मुलींचे प्रमाण जास्त असून जवळपास 42 टक्के मुलींना यामुळे दिवसभरात एक तास मोबाइल वापरण्यासाठी मिळतो. डिजिटल टेक्नॉलॉजी वापरण्यामध्ये मुलगी असणं हेसुद्धा खुप मॅटर करतं असं मत 65 टक्के शिक्षकांनी आणि 60 टक्के संस्थांनी व्यक्त केलं आहे. वयात आलेल्या पौगंडावस्थेतील मुलींना मोबाइल देणं हे असुरक्षित आणि आरोग्यासाठी चांगलं नसल्याचं बहुतांश पालकांना वाटतं असंही या सर्व्हेत म्हटलं आहे. 

हे वाचा - व्हॉटसअ‌ॅपने युजर्सना दिली गूड न्यूज; नवीन फीचर लाँच

कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत
सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार, जरी एखाद्या कुटुंबाला स्मार्ट फोन, कॉम्प्युचर विकत घेणे आर्थिकदृष्ट्या शक्य असले तरी, त्या वस्तू केवळ पुरुषांच्याच हातात येतात. त्याचबरोबर आर्थिकदष्ट्या सक्षम नसणं देखील मुलींसाठी अडचणीचं ठरत आहे. जवळपास 71 टक्के मुलींकडे स्वतःचा मोबाईल नाही कारण, त्या स्वतः विकत घेऊ शकत नाहीत. तसेच 81 टक्के कुटुंबांनी त्यांना मोबाईल परवडत नाही असं सांगितल तर, 79 टक्के कुटुंबांमध्ये कॉम्प्युटरच नाही. 

हे वाचा - ऑनलाईन पेमेंटसाठी गुगल पे, फोन पे वापरताय? तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

मुलीदेखील स्वत:ला ठेवतात दूर
घरात मोबाईल किंवा कॉम्प्युटर परवडत नाही म्हणून, शाळा किंवा एखाद्या सामाजिक संस्थेत मुलींना कॉम्प्युटर मिळण्याची शक्यताही फार कमी आहे. शाळा, कॉलेजमध्ये 81 टक्के मुलींना कॉम्प्युटर वापरायची संधी एक तासापेक्षाही कमी मिळते. मुळात मुलीदेखील मोबाईल आणि गॅझेट्सपासून स्वतःला दूर ठेवत असल्याचे सर्वेक्षणातून दिसले, कारण, 32 टक्के मुली स्मार्ट फोनवर कॉल रिसिव्ह करतानाही अडखळतात. तर, 26 टक्के मुलींना घड्याळ, कॅलक्युलेटर, टॉर्च आणि इतर ऍप्स वापरता येतात.

loading image