WhatsApp ची नवी पॉलिसी स्वीकारली नाही, लवकरच डिलिट होणार अकाऊंट!

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 22 February 2021

गेले काही महिने WhatsApp चर्चेत राहिलं आहे. याचे कारण कंपनीने आणलेली नवी प्रायव्हेसी पॉलिसी (Privacy Policy) ठरली आहे.

नवी दिल्ली- गेले काही महिने WhatsApp चर्चेत राहिलं आहे. याचे कारण कंपनीने आणलेली नवी प्रायव्हेसी पॉलिसी (Privacy Policy) ठरली आहे. नव्या नियम-कायद्यांमुळे WhatsApp ला मोठी टीका सहन करावी लागली होती. अनेक युझर्संनी दुसऱ्या मेसेजिंग ऍप्सचा पर्याय स्वीकारला आहे. त्यानंतर कंपनीने लोकांना प्रायव्हेसी पॉलिसीबाबत समजवण्यासाठी याला लागू करण्याची डेडलाईन वाढवली होती.  WhatsApp ने 15 मे पर्यंत प्रायव्हेसी पॉलिसी मान्य करण्याचे बंधन घातले होते. कंपनीने आता स्पष्ट केलंय की, नवी प्रायव्हेसी पॉलिसी 15 मे पासून लागू केली जाईल. त्यामुळे युझर्संना नवी प्रायव्हेसी पॉलिसी स्वीकारावी लागेल, अन्यथा त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. 

परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारा 'पेन्शन'; सोनाली वेगळ्या भूमिकेत

युझरने 15 मेपर्यंत नव्या अटी-शर्ती स्वीकारल्या नाहीत, तर WhatsApp अकाऊंटची कार्यक्षमता कमी होऊ शकते. ऑफिशियल WhatsApp FAQ मध्ये सांगण्यात आलंय की, पॉलिसी स्वाकारली नाही तर तुम्हाला  कॉल घेता येतील आणि नोटिफिकेशन पाहता येतील, पण तुम्ही WhatsApp मेसेज सेंड करु शकणार नाही किंवा रिसिव्ह करु शकणार नाही. यामुळे स्पष्ट होतंय की WhatsApp आपल्या युझर्संना नवीन पॉलिसी स्वीकारण्यासाठी भाग पाडत आहे. 

युझर्संनी जर WhatsApp ची नवी प्रायव्हेसी पॉलिसी स्वीकारली नाही, तर त्यांचे अकाऊंट तात्काळ बंद केले जाणार नाही. अशा स्थितीतही त्यांना ऍप 120  दिवसांपर्यंत वापरता येणार आहे. पण, या 120 दिवसामध्ये अकाऊंटचा वापर मर्यादित स्वरुपात करता येणार आहे. 120 दिवसापर्यंत पॉलिसी स्वीकारली नसल्यास तुमचे अकाऊंट डिटिल केले जाणार आहे. 

इन्स्टाग्राम वापरताय, या गोष्टी माहिती नसतील तर होईल फसवणूक

WhatsApp FAQ मध्ये काय सांगण्यात आलंय

WhatsApp ने अधिकृतरित्या FAQ मध्ये सांगितलंय की, युझर्सला कॉल आणि नोटिफिकेशन मिळू शकतील, पण तो मेसेज वाचू किंवा पाठवू शकणार नाही. WhatsApp ने सांगितलंय की, अकाऊंट एकदा डिलिट झाल्यास पुन्हा ते मिळू शकणार नाही. कंपनीने सांगितलंय की आम्ही डिटिल केलेले अकाऊंट पुन्हा रिव्हर्स करु शकत नाही. युझर्सची मेसेज हिस्ट्री पूर्णपणे डिलिट होईल. तसेच युझर्सला WhatsApp ग्रुपमधून काढून टाकण्यात येईल. 15 तारखेपर्यंत युझर्स आपली चॅट हिस्ट्री Android किंवा iPhone मध्ये एक्सपोर्ट करु शकतील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: WhatsApp account will stop working after 120 day privacy policy