Mosquito Killer Machine : मशीन एक काम अनेक, डासांसह इतर किड्यांनाही सहज घालवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mosquito Killer Machine

Mosquito Killer Machine : मशीन एक काम अनेक, डासांसह इतर किड्यांनाही सहज घालवा

Mosquito Killer Machine : सध्याच्या सतत बदलणाऱ्या वातावरणात डासांचे आणि इतर किड्यांची उत्पत्ती वाढली आहे. मलेरिया, डेंग्यू, फूड पॉयझनिंग अशा अनेक आजाराच्या बातम्या रोज ऐकायला येत असतात. बऱ्याचदा तर आपल्या घरातच याचे रूग्ण असतात. या सगळ्या प्रश्नांवर Ultrasonic Electric Pest Repellent हा एक उपाय आहे.

हेही वाचा: Tech Tips : गुगल सर्च रिझल्टमधून तुमची माहिती कशी हटवाल ?

आपण यासाठी वेगवेगळ्या कॉईल वापरतो. पण त्यामुळे डास, किडे पळण्याऐवजी त्या धूराचा आपल्या घशाला, डोळ्यांनाच त्रास होतो. या सगळ्यावर उपाय असणाऱ्या या उपकरणामुळे डास, उंदीर, किडे, किटक यांचाही नाश होतो.

हेही वाचा: Mosquito Terminator Train : आता IRCTC ने सुरू केली डासांसाठीही स्पेशल ट्रेन

मॉस्किटो रिपेलंट कसे काम करते?

हे वापरणे फार सोपे आहे. अन्य कोणत्याही डास घालवण्यासाठी वपरल्या जाणाऱ्या लिक्वीड मशीनसारखेच वापरावे. सॉकेटमध्ये टाकल्यावर ते आपोआप काम करते.

हेही वाचा: Mosquitoes Bite: डास चावल्यामुळे येते खाज आणि त्वचेवर होते जळजळ ? करून बघा हे घरगुती उपाय

पण ते मशीन लावताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कंपनीच्या मते हे मशीन जमीनीपासून ३०-५० इंच वर लावावे. ज्यामुळे जमीनीवरच्या आणि उडणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या किड्यांवर त्याचा परिणाम होईल.

टॅग्स :MosquitoPest Control