प्रायव्हसी पॉलिसीने WhatsApp ची गेम; Telegram ला झाला फायदा

whatsapp telegram play store
whatsapp telegram play store

नवी दिल्ली - व्हॉटसअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीची चर्चा गेल्या महिन्याभरात मोठ्या प्रमाणावर झाली. या प्रायव्हसी पॉलिसीचा फटका कंपनीला बसला आहे. भारतात यामुळे व्हॉटसअ‍ॅप युजर्सनी पर्यायी अ‍ॅप शोधण्यास सुरुवात केली. टेलिग्रामने जानेवारी 2021 मध्ये नॉन गेमिंग अ‍ॅपमध्ये डाउनलोडिंगच्या बाबतीत मागे टाकले. सेन्सर टॉवरच्या रिपोर्टमध्ये याची माहिती देण्यात आली आहे. टेलिग्राम मेसेजिंग अ‍ॅप 63 मिलियनहून अधिक वेळा इन्स्टॉल करण्यात आलं आहे. जानेवारी 2020 च्या तुलनेत हे प्रमाण 3.8 टक्के इतकं जास्त आहे. 

व्हॉटसअ‍ॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे झालेल्या वादाचा टेलिग्रामला फायदा झाला. व्हॉटसअ‍ॅपच्या युजर्सनी नवीन नियम आणि अटींमुळे इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केली आहे. टेलिग्रामला गुगल प्ले स्टोअरवर सर्वाधिकवेळा डाउनलोड करण्यात आलं आहे. तर अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर टेलिग्राम चौथ्या क्रमांकावर आहे. आयओएस डिव्हाइसवर टिकटॉक जानेवारी 2021 मध्ये सर्वाधिक डाउनलोड करण्यात आलेलं अ‍ॅप ठरलं आहे. त्यानंतर युट्यूब आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप झूमचा नंबर लागतो. 

टिकटॉक जानेवारी 2021 मध्ये 10 लाखांच्या वर डाउनलोड केलं गेलं. तर टेलिग्राम डिसेंबर महिन्यात डाउनलोडच्या बाबतीत नवव्या क्रमांकवर होते ते जानेवारी 2021 मध्ये पहिल्या स्थानावर पोहोचले आहे. टेलिग्राम 63 मिलियन वेळा डाउनलोड झाले असून यातील 24 टक्के संख्या ही भारतातील आहे. तर इंडोनेशियात हेच प्रमाण 10 टक्के इतकं आहे. 

व्हॉटसअ‍ॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीचा फायदा फक्त टेलिग्रामला झाला असं नाही. तर इतर मेसेजिंग अ‍ॅपलाही यामुळे बराच फायदा झाला. यामध्ये सिग्नल मेसेजिंग अ‍ॅपच्या डाउनलोडिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. गुगल प्ले स्टोअरवर सिग्नल दुसरे सर्वाधिक डाउनलोड कऱण्यात आलेलं मेसेजिंग अ‍ॅप आहे. अ‍ॅपल स्टोअरवरसुद्धा टॉप टेनमध्ये सिग्नलने स्थान मिळवलं. टेस्लाचे संस्थापक अ‍ॅलन मस्क यांनी केलेल्या ट्विटनंतर सिग्नल डाउनलोड करण्याचं प्रमाण वाढलं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com