Whatsapp चं देशी व्हर्जन, सरकारी अधिकारी वापरतायत Sandes

टीम ई सकाळ
Monday, 8 February 2021

गेल्या वर्षी भारत सरकारने म्हटलं होतं की, ते व्हॉटसअ‍ॅपसारख्या एका चॅट फीचरवर काम करत आहे. आता Sandes अ‍ॅप पूर्णपणे तयार झालं आहे.

नवी - गेल्या वर्षी भारत सरकारने म्हटलं होतं की, ते व्हॉटसअ‍ॅपसारख्या एका चॅट फीचरवर काम करत आहे. आता Sandes अ‍ॅप पूर्णपणे तयार झालं आहे. काही सरकारी अधिकाऱ्यांनी व्हॉटसअ‍ॅपच्या या देशी व्हर्जनचा वापर सुरू केला आहे. काही अधिकारी सध्या याचा वापर करत आहेत. 

गव्हर्नमेंट इन्स्टंट मेसेजिंग सिस्टिम एक सोपं अ‍ॅप आहे. गेल्या वर्षी सरकारने याची घोषणा केली होती तेव्हा याचं नावं GIMS असेल असं म्हटलं जात होतं. मात्र याचं नाव देशी Sandes ठेवलं आहे. 

बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार GIMS.gov.in वर या अ‍ॅपची माहिती तुम्हाला मिळेल. अ‍ॅपमध्ये लॉगइन कसं करायचं हेसुद्धा सांगितलं आहे. कोणत्याही पर्यायावर क्लिक केल्यानंतर ते वाचू शकता. सध्या जी ऑथेंटिकेशनची जी पद्धत आहे ती फक्त सरकारी अधिकाऱ्यांसाठीच आहे. सर्वसामान्यांसाठी हे अ‍ॅप उपलब्ध करताना यामध्ये बदल केला जाऊ शकतो.

हे वाचा - Twitter डाउन, केवळ भारतातील युजर्सच झाले त्रस्त

रिपोर्टनुसार, सध्या व्हॉटसअ‍ॅपचं हे देशी व्हर्जन फक्त सरकारी अधिकाऱ्यांसाठीच आहे. हे सर्वसामान्यांसाठी कधी रोलआउट केलं जाईल याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र लवकरच हे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल असं म्हटलं जात आहे. 

Sandes अ‍ॅप iOS  आणि अँड्रॉइड अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर काम करते. हे अ‍ॅप व्हॉइस आणि डेटाला सपोर्ट करते. एक मॉडर्न डे चॅटिंग अ‍ॅप आहे. या अ‍ॅपचं बॅकएंड नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर हँडल करते. हे आयटी मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. 

फक्त 10 मिनिटांत स्मार्टफोनचं चार्जिंग होणार फुल्ल; येतेय नवीन टेक्नॉलॉजी

Sandes अ‍ॅप अशावेळी मार्केटमध्ये येत आहे जेव्हा व्हॉटसअ‍ॅपबाबत युजर्सच्या मनात शंका निर्माण झाली आहे. व्हॉटसअ‍ॅपच्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे युजर्सनी इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे कंपनीने् एक पाऊल मागेही घेतलं होतं. तसंच आपण डेटा शेअर करणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Some government officials using Sandes like WhatsApp alternative says report