Motor Vehicle Act : बुलेटवरून फटफट कराल तर बसतील पोलिसांचे फटके; वाचा काय आहे नियम!

मोटार नियमांचे उल्लंघन केल्याने तरूणांना बसला भु्र्दंड, वाचा काय आहे प्रकरण
Motor vehicle act
Motor vehicle actesakal

Bullet Silencer sound RTO Rules: वर्दळीच्या रस्त्यावरून फट् फट् करत जाणारी बुलेट सर्वांच्यात नजरेत येते. बुलेटचे असंख्य चाहते आहेत. त्यामूळेच बुलेट लाखांच्या घरात पोहोचली असली तरीही त्याचा चाहता वर्ग असंख्य आहे. त्यामुळे बुलेट घ्यायची आणि उगीचच रूबाबात बुलेट सुस्साट पळवायची, हे आजच्या तरूणांची क्रेझ आहे. पण हीच क्रेझ तुम्हाला अडचणीत आणू शकते.

 तुमच्या आवडत्या बुलेटच्या बदललेल्या सायलेन्सरमधून फटाक्यांचा आवाज काढून तुम्हालाही मजा येत असेल. तर सावधान. नवीन मोटार वाहन कायद्यानंतर तुमच्या या आवडीमुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

Motor vehicle act
Hyundai Motors: कन्फर्म! 'या' तारखेला येतेय Hyundai ची नवी इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये 600KM धावणार

हरियाणाच्या फरिदाबादमध्ये नवीन कायदा लागू झाल्यानंतर अशी सुमारे तीन प्रकरणे समोर आली आहेत. फटाक्यांचा आवाज काढणाऱ्या बुलेटस्वारांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी विशेष ड्राइव्ह सुरू केला असून, काही युवकांना बुलेटचा शौक लय भारी पडला. (Motor vehicle act)

 वेगाने मोटरसायकल व बुलेट चालविणाऱ्यांविरुद्ध वाहतूक शाखा पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. ज्यामध्ये अशा दुचाकीस्वारांना एकतर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच त्या तरूणांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. फरीदाबादच्या दोन तरुणांना त्यांच्या बुलेट मोटरसायकलमधून फटाक्यांचा आवाज काढण्याची मोठी किंमत मोजावी लागली.

Motor vehicle act
Tata Motors: आली रे आली! जबरदस्त फिचर अन् स्पीडसह टाटा मोटर्सची नेक्सॉन ईव्ही कार तयार

प्रत्यक्षात दोन दुचाकीस्वार हेल्मेटशिवाय गाडी पळवत होते. हे पाहून पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. पोलिसांना पाहताच त्याने आधी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला रोखले. विचारणा केली असता त्यांच्याकडे कागदपत्रे नव्हती. त्यामूळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

 पोलिसांनी मोटार वाहन कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत एका तरूणाला 40,000 रुपये तर दुसऱ्या तरूणाला 41,000 रुपयांचे चलन जारी केले.  बुलेटच्या आवाजामूळे या तरूणांना 41,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

हा तरूण हरियाणातील वल्लभगड भागातील रहिवासी आहे. कारवाई झाल्यानंतर थोड्याचवेळात त्याने दुचाकीची सर्व कागदपत्रे गोळा करून आणली. कागदपत्रे तपासल्यानंतर पोलिसांनी त्याच्या दंडाची रक्कम 21,000 हजार इतकी केली. या रकमेचे चलन भरल्यानंतर त्याला त्याची गाडी घेण्याची परवानगी देण्यात आली.

मात्र, पोलिसांनी त्याला सायलेन्सर तातडीने बदलण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु दुसऱ्या तरूणाची गाडी जप्त करण्यात आली आहे.

Motor vehicle act
Tata Motors : टाटा मोटर्सचा ग्राहकांना मोठा झटका, वाढवलेत 'या' कार्सचे दर

फरीदाबादमध्येच बाटा चौक परिसरात झोनल अधिकारी स्वत: रस्ता सुरक्षांचे नियम पाळण्यास तरूणांना प्रोत्याहन देण्यासाठी उपस्थित होते. तेव्हा एका बुलेटवर तीन तरुण येत होते. तिघेही हेल्मेटशिवाय होते. त्या तरूणाकडून ३५ हजार रुपयांची पावती फाडण्यात पोलिसांना यश आले आहे.

 या प्रकरणी दुचाकीस्वाराकडून कागदपत्रे मागितली असता त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना किंवा दुचाकीचे नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले.

त्‍याने त्‍याच्‍या बाईकचा थर्ड पार्टी इन्शुरन्स आणि पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट (PUC) देखील घेतलेला नाही. वरून ट्रिपल लोडिंग आणि सायलेन्सर मॉडिफाय केला होता. या सर्व कलमांची दंडाची रक्कम जोडल्यानंतर त्याला 35 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

Motor vehicle act
Bullet Rani Arrested : शिवांगी डबास अटकेत; पोलिसांवर हात उचलल्याचा आरोप

पोलिसांनी पावती कापली तर…

पोलिसांनी एखाद्या चौकात तूम्हाला अडवले, तूमची पावती कापली तर तूम्ही सर्व कागदपत्रे दाखवून आणि चलन भरून गाडी सोडवू शकता. अन्यथा तूमची गाडी जप्त केली जाते.

 नवीन मोटार वाहन कायद्यानूसार, वायू किंवा ध्वनी प्रदूषणासाठी 10,000 रुपयांच्या दंडाची तरतूद आहे. ऑटोमोटिव्ह नियमांनुसार, वाहनांच्या हालचालीमुळे निर्माण होणारा आवाज 80 डेसिबलपेक्षा जास्त नसावा. तर, सुधारित वाहनांच्या सायलेन्सरमधून बाहेर पडणारा आवाज १०० डेसिबलपेक्षा जास्त असेल, तो निषिद्ध आहे.

 मोटार वाहन कायद्यांतर्गत, जर एखाद्या व्यक्तीने वाहन चालवताना रस्ता सुरक्षा, ध्वनी आणि वायू प्रदूषणाशी संबंधित विहित मानकांचे उल्लंघन केले तर तो गुन्ह्याच्या श्रेणीत येतो.

Motor vehicle act
Latest Marathi News : Bullet घेण्यासाठी विवाहितेचा छळ; 7 जणांविरुद्ध गुन्हा

मोटार वाहन कायदा-1988 आणि मोटार वाहन नियम-1989 नुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध आहेत. तरीही शहरात असंख्य वाहनचालकांची भाईगिरी सुरू आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात. (bullet silencer sound RTO rules)

सायलेंसरमध्येही बदल

कंपनीच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर बसवले जात आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होत आहे. बुलेटच्या सायलेन्सरवर वाहतूक विभागाकडून कारवाई सुरू आहे. सायलेन्सर बदलून मोठा आवाज व फटाके वाजवणाऱ्या सायलेन्सरवर बंदी आणली आहे. पण तरीही तरूणांनी फॅशन म्हणून असे सायलेंसर बसवले आहेत.

 दुचाकीस्वारांसाठीचे नियम

  • वाहन चालकाने वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये.

  • भार क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करू नये.

  • वाहतूक चिन्हांचे व संकेतांचे उल्लंघन करू नये.

  • वाहन चालविताना योग्य इशाऱ्यांचा वापर करावा. 

  • वाहन धोकादायक स्थितीत उभे करून ठेऊ नये. 

  • चालकास अडथळा होईल अशा ठिकाणी प्रवासी किंवा एखादी वस्तू ठेऊ नये. 

  • योग्य ती काळजी घेतल्याशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे करू नये. 

  • हेलमेट परिधान न करता वाहन चालविणे. 

  • रस्त्यावर वाहन तपासणीच्या वेळी वाहनाची संबंधित सर्व प्रमाणपत्रे सादर करणे.

  • गणवेशधारी अधिकाऱ्याने थांबण्याचा इशारा दिल्यानंतर वाहन थांबविणे.

  • अपघात घडल्यानंतर संबंधित महिती २४ तासांच्या आत पोलिसांना कळविणे व अपघातग्रस्तांना योग्य ती मदत करणे. 

  • दारू किंवा अंमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवू नये. 

  • मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या अपात्र असताना वाहन चालवू नये. 

  • वाहन चालवित असताना मोबाईल फोनचा वापर करू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com