Motorola Edge 20 Pro झाला लॉंच, काय आहे किंमत? वाचा डिटेल्स

Motorola Edge 20 Pro
Motorola Edge 20 Promotorola edge 20 pro launch in india

Motorola Edge 20 Pro या कंपनीच्या Motorola Edge 20 सीरीजमधील लेटेस्ट मॉडेल भारतात लॉन्च करण्यात आले आहे. हा नवीन मोटोरोला फोन 144Hz AMOLED डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरे देण्यात आला आहे. त्यासोबतच तुम्हाला यात होल-पंच डिस्प्ले डिझाइन दिले आहे. इतर प्रमुख फीचर्समध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870, 30 डब्ल्यू फास्ट चार्जिंग आणि 5 जी सपोर्ट यांचा समावेश होतो. चला तर मग या स्मार्टफोनबद्दल सविस्तार जाणून घेऊया.

भारतात किंमत आणि ऑफर लाँच

भारतात मोटोरोला एज 20 प्रोची किंमत 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी 36,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन मिडनाईट स्काय आणि रेनबो क्लाउड कलर ऑप्शनमध्ये येतो आणि रविवार, 3 ऑक्टोबरपासून फ्लिपकार्टवर प्री-ऑर्डर स्वीकारल्या जाणार आहेत. तसेच मोटोरोला एज 20 प्रोवर लॉन्च ऑफर्समध्ये फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल अंतर्गत एक्सिस आणि आयसीआयसीआय बँक कार्डवर 10% सूट देण्यात येणार आहे. आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डद्वारे सहा महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील असतील. तर 12GB RAM + 256GB स्टोरेज कॉन्फिगरेशनसाठी मोटोरोला एज 20 प्रो युरोपमध्ये 699.99 (अंदाजे 60,200 रुपये) च्या किंमतीसह युरोपमध्ये लाँच करण्यात आला.

Motorola Edge 20 Pro
महिंद्रा Xuv700 ची बुकिंग 'या' तारखेला होणार सुरू, पाहा डिटेल्स

स्पेसिफीकेशन्स

ड्युअल-सिम (नॅनो) मोटोरोला एज 20 प्रो अँड्रॉइड 11 वर माय यूएक्स वर चालतो आणि या फोनमध्ये 6.7-इंच फुल-एचडी+ (1,080 × 2,400 पिक्सेल) मॅक्स व्हिजन एमोलेड डिस्प्ले दिला आहे ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट आणि 576Hz टच मिळेल . लेटन्सी डिस्प्लेमध्ये 20: 9 आस्पेक्ट रेशियो आणि HDR10+ सपोर्टसह 2.5D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देण्यात आले आहे. मोटोरोला एज 20 प्रो मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 एसओसी, एड्रेनो 650 जीपीयू आणि 8 जीबी एलपीडीडीआर 5 रॅम तसेच फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये तुम्हाला 108-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर f/1.9 लेन्ससह येतो. तसेच पेरिस्कोप आकारात टेलीफोटो लेन्ससह एफ/3.4 अपर्चरसह 8-मेगापिक्सेल सेन्सर देखील मिळेल. याशिवाय, बॅक कॅमेरा सेटअप 16-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड शूटरसह येतो.

सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी, मोटोरोला एज 20 प्रो 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर f/2.25 लेन्ससह देण्यात आलेला आहे. मोटोरोला एज 20 प्रो 128GB UFS 3.1 स्टोरेज, कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth v5.1, GPS/ A-GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट यांचा समावेश आहे. सेन्सरमध्ये एक्सेलेरोमीटर, एंबियंट लाईट, जायरोस्कोप, मॅग्नेटोमीटर आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देण्यात आले आहेत. फोनमध्ये साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे जो पॉवर बटणाच्या खाली दिलेले असेल.

मोटोरोला कंपनीने या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी दिली आहे जी 30W टर्बोपावर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच हा फोन IP52- रेटेड अॅल्युमिनियम अलॉय कन्स्ट्रक्शन मध्ये येतो आणि यामध्ये Waves Maxx Audio Mobile द्वारे ट्यून केलेले सिंगल बॉटम स्पीकर दिले आहे. तर या फोनचे डायमेनंशन्स 163x76x7.99 मिमी आणि वजन 190 ग्रॅम आहे.

Motorola Edge 20 Pro
इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये लिंक कशी ॲड करावी? वाचा सविस्तर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com