Motorola Rollable Phone : स्मार्टवॉच विसरा, आता मनगटावर गुंडाळता येणार चक्क स्मार्टफोन; पाहा व्हिडिओ

लिनोव्हो टेक वर्ल्ड इव्हेंटमध्ये मोटोरोलाने हा स्मार्टफोन सादर केला आहे.
Motorola Rollable Phone
Motorola Rollable PhoneeSakal

स्मार्टफोन मार्केटमध्ये अगदी दररोज नवीन अपडेट्स सादर होत आहेत. फोल्डेबल स्मार्टफोन ही गोष्ट आता सामान्य होत असतानाच, मोटोरोलाने चक्क 'रोलेबल' फोन सादर करुन सर्वांनाच झटका दिला आहे. हा स्मार्टफोन चक्क तुम्ही आपल्या मनगटावर घड्याळाप्रमाणे घालू शकणार आहात.

टिपस्टर अभिषेक यादव याने आपल्या एक्स हँडलवरुन याचा व्हिडिओ शेअर केला आहे. मोटोरोलाचा हा मोबाईल एक प्रोटोटाईप असून, त्याचे काही फीचर्स देखील समोर आले आहेत. लिनोव्हो टेक वर्ल्ड इव्हेंटमध्ये मोटोरोलाने हा स्मार्टफोन सादर केला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 6.9 इंच मोठी स्क्रीन मिळणार आहे. यात पंच होल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या मागच्या बाजूला ग्लास किंवा मेटल ऐवजी फॅब्रिक मटेरिअल देण्यात आलं आहे, ज्यामुळे या स्मार्टफोनला अतिशय मजबूत ग्रिप मिळते. (Tech News)

Motorola Rollable Phone
Oppo Find N3 Flip : ओप्पोने भारतात लाँच केला स्टायलिश फ्लिप फोन; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

या स्मार्टफोनची स्क्रीन अ‍ॅडाप्टिव्ह आहे. म्हणजेच, स्मार्टफोनची खालची बाजू दुमडल्यानंतर ती स्टँडप्रमाणे वापरता येईल. तर वरच्या बाजूला उरलेली 4.6 इंच स्क्रीन कामासाठी वापरता येणार आहे. मोटो एआयच्या मदतीने फोनचा वॉलपेपर देखील कस्टमाईज करता येणार आहे.

या फोनमध्ये असणारी बॅटरी, सॉफ्टवेअर किंवा इतर कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. हा केवळ एक कन्सेप्ट स्मार्टफोन असून, तो खरोखर लोकांसाठी उपलब्ध होईल का याबाबत देखील स्पष्टता नाहीये. मात्र, फोल्डेबल फोनची लोकप्रियता पाहता, या फोनचं मोठ्या स्तरावर उत्पादन करण्याचा विचार कंपनी करु शकते, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com