स्पेक्ट्रम म्हणजे काय? टेलिकॉम क्षेत्रात याचा कसा वापर होतो? काय आहे लिलावाची पद्धत, वाचा...

What is spectrum How is it used in telecom sector
What is spectrum How is it used in telecom sector

नागपूर : संवाद साधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रेडिओ लहरींना स्पेक्ट्रम असे म्हणतात. टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात कुठल्याही प्रकारचा संवाद साधायचा असेल याच लहरींचा वापर केला जातो. मात्र, स्पेक्ट्रम हा शब्द घोटाळ्यानंतर सर्वाधिक चर्चेला आला. त्यामुळे स्पेक्ट्रम हा शब्द अनेकांसाठी नवीन नाही. कारण, स्पेक्ट्रम घोटाळा देशात चांगलाच गाजला होता. यामुळे अनेकांना याबद्दल माहिती आहे, असे आपण समजू. मात्र, स्पेक्ट्रम काय असते? आणि त्याचा टेलिकॉम क्षेत्रात कसा वापर होतो? हे मात्र अनेकांना माहिती नाही. 

स्पेक्ट्रम हे अँड्रॉइड व इतर कोणत्याही मोबाइलच्या २जी, ३जी आणि ४जी नेटवर्कशी संबंधित आहे. सरळ सरळ सांगायचे झाल तर स्पेक्ट्रमचा थेट संबंध मोबाइल इंडस्ट्री आणि अन्य क्षेत्रासाठी एयरवेब्ससाठी म्हणजेच संचारासाठी रेडिओ फ्रीक्चेंसी आहे. एक मार्च रोजी स्पेक्ट्रम लिलावाच्या पहिल्या दिवशी ७७,१४६ कोटींची बोली लागली. ही बोली रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाकडून आली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा स्पेक्ट्रमच्या लिलावाशी संबंधित चर्चांवर चर्चा होत आहे.

अधिक वाचा - भाजपसाठी धोक्याची घंटा! सर्वेक्षणातून समोर आला धक्कादायक निष्कर्ष; नेत्यांची चिंता वाढली

कॅगच्या अहवालानुसार 2जी स्पेक्ट्रम घोटाळा हा तब्बल एक लाख ७६ हजार कोटींचा होता. पण २०११ मध्ये तत्कालीन दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी या प्रकरणी देशाचे शून्य रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा केला होता. टेलिकॉम स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया खुली असते. लिलावाच्या वेळी असलेल्या बाजारभावानुसार स्पेक्ट्रमची किंमत ठरवली जाते. 2जी स्पेक्ट्रम प्रकरणी लिलाव २००८ साली झाला. पण, कंपन्यांसाठी ही किंमत २००१च्या बाजारभावाप्रमाणे ठरवली गेली. त्यामुळे स्पेक्ट्रमच्या लिलावातून जितका नफा सरकारला मिळाला असता तितका नफा मिळाला नाही.

यामुळे बऱ्याच लोकांना स्पेक्ट्रम लिलाव म्हणजे काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकताही आहे. कारण, आपल्यापैकी बऱ्याच जणांना स्पेक्ट्रम लिलावाबद्दल काहीही माहिती नाही. स्पेक्ट्रम हे २जी, ३जी आणि ४जी नेटवर्कशी जोडलेले आहे. आता आपण स्पेक्ट्रम लिलावाबद्दल जाणून घेऊ या...

स्पेक्ट्रम म्हणजे काय?

स्पेक्ट्रम लिलावाबद्दल जाणून घेण्यापूर्वी स्पेक्ट्रम म्हणजे काय हे माहीत असणे फार गरजेचे आहे. सरळ आणि सोप्या शब्दात सांगायचे झाले तर हे विद्युत चुंबकीय स्पेक्ट्रमचे एक लहान रूप आहे. हे पृथ्वीभोवती किरणोत्सर्गी ऊर्जेचे नाव आहे. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा मुख्य स्रोत सूर्य आहे. ही ऊर्जा पृथ्वीवरील दफन केलेल्या किरणोत्सर्गी घटक तसेच तारे व आकाशगंगांसोबत मिळते. या ऊर्जेद्वारे आपण टीव्ही, रेडिओ आणि मोबाइल फोन चालवू शकतो.

टेलीकॉम सेक्टरमध्ये स्पेक्ट्रमचा वापर

दूरसंचार क्षेत्रात स्पेक्ट्रम खूप महत्त्वाचा आहे. याद्वारेच मोबाईल, टेलिव्हिजनमध्ये, रेडिओ आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिकचा वापर केला जातो. यामुळे मोबाइल आणि टेलिव्हिजन क्षेत्रात स्पेक्ट्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. कोणत्याही स्पेक्ट्रमचा व्यवसाय वापर लाटांच्या लांबीवर निश्चित केला जातो? त्याची फ्रीक्वेंसी किती आहे? आणि किती ऊर्जा किती दूरपर्यंत घेऊन जाऊ शकते? सर्वांत लांब लाटा रेडिओ वेव्ह स्पेक्ट्रममध्ये आहेत आणि ते दूरसंचार क्षेत्रात वापरतात. सर्वांत लांब तरंग वेव स्पेक्ट्रमची असते. याचा उपयोग टेलीकॉम सेक्टरमध्ये केला जातो.

यंदा स्पेक्ट्रमचा कालावधी २० वर्षांसाठी

२०१५ मध्ये स्पेक्ट्रमचा लिलाव झाला होता. आता पाच वर्षांनंतर पुन्हा स्पेक्ट्रमचा लिलाव केला जात आहे. या लिलावाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य़ म्हणजे स्पेक्ट्रमचा कालावधी २० वर्षे असेल. यात खासगी क्षेत्रातील दूरसंचार कंपन्यांनी १३,४७५ कोटींची आरंभिक अर्नेस्ट मनी डिपॉझिट (ईएमडी) जमा केली आहे. यात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचा समावेश आहे.

लिलावात ५ जीचा समावेश नाही

स्पेक्ट्रमच्या लिलावात ५ जी स्पेक्ट्रमचा समावेश नाही. याचा नंतर लिलाव होईल. यावेळी एकूण ७ फ्रिक्वेन्सी बँडचा लिलाव होत आहे. ज्यात ७०० MHz, ८०० MHz, ९०० MHz, १,८०० MHz, २,१००MHz, २,३०० MHz आणि २,५०० MHz बँडचा समावेश आहे. निविदादारास ईएमआयद्वारे पैसे भरण्याची सुविधा मिळणार आहे.

संकलन आणि संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com