
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला त्यांचे मिशन पूर्ण करून आज चार अंतराळवीरांसह पृथ्वीवर परतले आहेत. शुभांशू यांनी या मिशन दरम्यान सुमारे १८ दिवस अंतराळात घालवले आहेत. या काळात त्यांनी अनेक प्रयोग देखील केले आहेत. सुमारे २३ तासांच्या प्रवासानंतर त्यांचे ड्रॅगन अंतराळयान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरले आहे.