टाटाची नवीन ‘एस गोल्‍ड पेट्रोल सीएक्‍स’ बाजारात दाखल

जाणून घ्या, ace gold petrol cx ची किंमत
टाटाची नवीन ‘एस गोल्‍ड पेट्रोल सीएक्‍स’ बाजारात दाखल

टाटा मोटर्स tata-motors या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने त्‍यांच्‍या लोकप्रिय स्‍मॉल कमर्शियल व्हेईकलचे (एससीव्‍ही) नवं व्‍हेरिएंट ‘एस गोल्‍ड पेट्रोल सीएक्‍स’ बाजारात दाखल केलं आहे. या गाडीची किंमत ३.९९ लाखांपासून सुरू होते. ही गाडी दोन व्‍हेरिएंटमध्ये उपलब्‍ध असून फ्लॅट बेड व्‍हेरिएंटची किंमत ३.९९ लाख, तर हाफ डेक लोड बॉडी व्‍ह‍ेरिएंटची किंमत ४.१० लाख रूपये ठेवण्यात आली आहे. (new-car-launches-tata-motors-launches-the-all-new-ace-gold-petrol-cx-ssj93)

टाटाची नवीन ‘एस गोल्‍ड पेट्रोल सीएक्‍स’ बाजारात दाखल
पिरीअड मिस झाल्यावरही प्रेग्नंसी टेस्ट निगेटिव्ह येतीये?

टाटा एस गोल्‍ड पेट्रोल सीएक्‍स व्‍हेरिएण्‍ट ही भारतातील २-सिलिंडर इंजिनची शक्‍ती आणि एकूण वाहन वजन १.५ टनपेक्षा अधिक असलेली एकमेव चार-चाकी एससीव्‍ही आहे. या गाडीमध्‍ये ४-स्‍पीड ट्रान्‍समिशन, ६९४ सीसी इंजिन आहे.

फळे, पालेभाल्‍या व कृषी उत्‍पादने, पेय व बॉटल्‍स, एफएमसीजी व एफएमसीडी सामान, ई-कॉमर्स, पार्सल व कुरिअर, फर्निचर, पॅक केलेले एलपीजी सिलिंडर्स, डेअरी, फार्मा व खाद्यपदार्थ उत्‍पादने, रेफ्रिजरेटेड परिवहन यांच्‍या वितरणासाठी आणि कचरा व्‍यवस्‍थापनासाठी या गाडीचा वापर होऊ शकतो.

टाटाची नवीन ‘एस गोल्‍ड पेट्रोल सीएक्‍स’ बाजारात दाखल
लव्ह मॅरेजला आई-वडिलांचा विरोध आहे?

नवीन एस गोल्‍ड पेट्रोल सीएक्‍सचे लाँच ‘छोटा हाथी’च्‍या प्रवासामधील आणखी एका सुवर्ण टप्पा आहे. टाटा एस प्रबळ, विश्‍वसनीय व बहुउद्देशीय गाडी ठरत आहे. या गाडीने आतापर्यंत २३ लाखांहून अधिक भारतीयांना उदरनिर्वाहाचे साधन दिलं आहे, असं टाटा मोटर्स प्रॉडक्‍ट लाईन-एससीव्‍ही व पीयूचे उपाध्‍यक्ष विनय पाठक यांनी सांगितले.

विशेष ऑफर

एस गोल्डच्या सुलभ खरेदीसाठी टाटा मोटर्सने स्‍टेट बँक ऑफ इंडियासोबत भागीदारी केली आहे. या माध्‍यमातून ग्राहकांना ७ हजार ५०० रूपये इतका कमी ईएमआय व जवळपास ९० टक्‍क्‍यांपर्यंत ऑन-रोड फायनान्‍सची ऑफर मिळणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com