Citroen C3 Aircross: आज लाँच होणार 7 सीटर Citroen C3 Aircross SUV, Hyundai Creta ला देणार टक्कर

कंपनी आज ग्राहकांसाठी त्यांची नवीन कार Citroen C3 Aircross लाँच करणार आहे.
Citroen C3 Aircross
Citroen C3 AircrossSakal

Citroen C3 Aircross: वाहन निर्माता कंपनी Citroen मध्यम आकाराच्या SUV सेगमेंटमध्ये प्रवेश करणार आहे. कंपनी आज ग्राहकांसाठी त्यांची नवीन कार Citroen C3 Aircross लाँच करणार आहे. अधिकृत लॉन्चपूर्वी या कारशी संबंधित अनेक तपशील लीक झाले आहेत, आम्ही तुम्हाला या कारमध्ये उपलब्ध संभाव्य वैशिष्ट्यांशी संबंधित माहिती देऊ.

'या' वाहनांशी असेल स्पर्धा:

अधिकृतरीत्या लॉन्च झाल्यानंतर, ही सिट्रोएन कार मारुती सुझुकी ग्रँड विटारा, ह्युंदाई क्रेटा, टोयोटा अर्बन, फोक्सवॅगन तैगुन आणि SUV आणि MPV सेगमेंटमध्ये उपलब्ध असलेल्या Kia Carens या कारशी स्पर्धा करेल.

Citroen C3 Aircross
Jio vs Airtel: जिओच्या वादळात एअरटेलला कसं सावरलं? सुनील भारती मित्तल यांनी सांगितला फंडा...

काही काळापूर्वी या कारचे स्पाय इमेजेस लीक झाले होते, जे पाहून असं दिसतं की कंपनी ही कार ग्राहकांसाठी दोन पर्यायांसह लॉन्च करणार आहे. ही मध्यम आकाराची SUV कार 5 आसनक्षमता आणि 7 आसनक्षमतेसह लॉन्च केली जाऊ शकते.

या कारमध्ये थ्री रो सीटरचा पर्याय पाहता येईल, एवढेच नाही तर एसीला जास्त थंड करण्यासाठी छतावर बसवलेले एसी व्हेंट्स आणि दुसऱ्या रांगेत पंख्याचा वेग नियंत्रित करण्यासाठी नॉब देखील मिळू शकतात.

या कारचा डॅशबोर्ड कंपनीच्या आधीच अस्तित्वात असलेल्या C3 हॅचबॅक सारखा असू शकतो. या कारमध्ये 10-इंचाचा इन्फोटेनमेंट डिस्प्ले आणि क्रोम फिनिशसह फ्रंट एसी व्हेंट्स मिळू शकतात. बाहेरील भागाबद्दल बोलायचे झाले तर, या कारमध्ये तुम्हाला LED DRL सह हेडलाइट युनिट दिसेल.

इंजिन पर्याय:

या कारला 1.2 लीटर नॅचरली एस्पिरेटेड इंजिन आणि 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असे दोन पर्याय मिळू शकतात. पहिला प्रकार 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह लॉन्च केला जाऊ शकतो तर दुसरा प्रकार 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह लॉन्च केला जाऊ शकतो.

Citroen C3 Aircross
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com