
लवकरच येतेय Maruti Suzuki Brezza; मिळतील हे टॉप 10 फीचर्स
मारुती सुझुकी लवकरच त्यांची SUV अपडेट करणार आहे. कंपनी पुढील वर्षी न्यू जनरेशन Vitara Brezza लाँच करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच, या आगामी एसयूव्हीचे काही फोटो देखील समोर आले होते, ज्यामध्ये त्याच्या लुक आणि डिझाइनबद्दल बरेच काही समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार कंपनी ही SUV Vitara Brezza ऐवजी 2022 Maruti Brezza म्हणून लॉन्च करेल. नवीन ब्रेझामध्ये बरेच नवे फीचर्स पाहायला मिळतील. यामध्ये सध्याच्या ब्रेझापेक्षा कित्येक पटीने भारी फीचर्स दिले जातील. आज आपण टॉप 10 अपडेट्स जाणून घेणार आहोत जे नवीन Brezza मध्ये पाहायला मिळू शकतात.
फॅक्टरी फिटेड सनरूफ्स सनरूफ
भारतीय ग्राहकांना गाडीमध्ये सनरुफ हवे असते. मारुतीने ग्राहकांची ही पसंती लक्षात घेऊन नवीन ब्रेझामध्ये इलेक्ट्रॉनिक सनरूफ देण्याचा निर्णय घेतला आहे. फॅक्टरी फिट सनरूफसह येणारे कंपनीचे हे पहिले मॉडेल असेल.
मोठी टचस्क्रीन
ब्रेझाचा लीक झालेला फोटो पाहता, असे म्हणता येईल की कंपनी यामध्ये फ्री स्टँडिंग, लार्ज टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देणार आहे. आत्तापर्यंत, कंपनी ब्रेझाच्या Zxi आणि Zxi+ प्रकारांमध्ये 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम ऑफर करत आहे, जी Android Auto आणि व्हॉइस कमांड सपोर्टसह येते.
वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी
नवीन ब्रेझामध्ये असलेली मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कार प्लेला देखील सपोर्ट करेल. त्याच्या मदतीने, तुम्ही तुमच्या फोनला वायरशिवाय सिस्टीमशी कनेक्ट करु शकाल. हे फीचर Brezza च्या टॉप-एंड व्हेरियंटमध्ये दिले जाण्याची अपेक्षा आहे.
नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये
नवीन Brezza मध्ये कन्सोलमध्ये मोठा बदल देखील दिसेल. कंपनी यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देऊ शकते. हे सीएजमध्ये देण्यात आलेल्या डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसारखे असू शकते.
वायरलेस चार्जिंग
वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोन्स आल्याने कारमधील वायरलेस चार्जिंग फीचरची ग्राहकांमध्ये मागणी वाढली आहे. सध्या बाजारात अशा अनेक कार आहेत, ज्यामध्ये हे फीचर दिले जात आहे. मारुती देखील नवीन Brezza मध्ये हे फीचर उपलब्ध करून देऊ शकते.
कनेक्टेड कार टेक
कंपनीने नवीन ब्रेझामध्ये रिमोट इंजिन स्टार्ट/स्टॉप, हेडलॅम्प आणि क्लायमेट कंट्रोल फंक्शन मॅनेज करण्यासाठी अडवांस कनेक्टेड कार टेक ऑफर केली जाऊ शकते.
360 डिग्री कॅमेरा
360 डिग्री कॅमेरा सुरक्षिततेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. हे ड्रायव्हरला कारच्या प्रत्येक बाजूचे रिअल-टाइम व्यू देते. Kia Sonnet मध्ये हे फीचर आधीपासून आहे आणि आता मारुती आपल्या नवीन Brezza मध्ये हे फीचर ऑफर करणार आहे.
पॅडल शिफ्टर्स
कंपनी नवीन ब्रेझाच्या ऑटोमॅटीक व्हर्जनमध्ये पॅडल शिफ्टर्स देखील देऊ शकते. आत्तापर्यंत, Kia Sonnet ही देशातील एकमेव सब-कॉम्पॅक्ट SUV आहे जी हे फीचर देते.
सेफ्टी फीचर्स
2022 मारुती ब्रेझा स्टँडर्ड सेफ्टी फीचर्ससह येऊ शकते. आत्तापर्यंत, Brezza चे स्टँडर्ड व्हेरियंट ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, रियर पार्किंग सेन्सर्स, फ्रंट सीटबेल्ट प्रीटेन्शन्स, EBD सह ABS, रिमोट कंट्रोल सेंट्रल लॉकिंग आणि Isofix चाइल्ड सीट माउंट्ससह ऑफर केले आहेत.
हायब्रीड टेक
रिपोर्ट्सनुसार, कंपनी सध्याच्या 12V माईल्ड हायब्रीड टेक्नॉलॉजीला 48V हायब्रीड सिस्टमसह नवीन ब्रेझामध्ये रिप्लेस करु शकते. यामुळे नवीन ब्रेझाला सध्याच्या ब्रेझाच्या तुलनेत चांगले मायलेज मिळणार आहे. नवीन Brezza मध्ये, कंपनी तेच 1.5 लीटर 4-सिलेंडर K15B पेट्रोल देईल. हे इंजिन 103bhp पॉवर आणि 138Nm टॉर्क जनरेट करते. ब्रेझा 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर पर्यायासह येईल.