

SIM Card Rules
ESakal
नवीन सिम कार्ड मिळवणे आता पूर्वीसारखे सोपे राहणार नाही. दूरसंचार विभागाने वापरकर्ता ओळखीसंदर्भात नवीन नियम जारी केले आहेत. नवीन सिम कनेक्शनसाठी आता बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक असेल, म्हणजेच केवळ केवायसी कागदपत्रे सादर करणे यापुढे पुरेसे ठरणार नाही. नवीन नियमांनुसार, वापरकर्त्यांची ओळख बायोमेट्रिक पद्धतीने देखील पडताळली जाईल. यामध्ये बोटांचे ठसे, चेहऱ्याची वैशिष्ट्ये किंवा डोळ्यांच्या बाहुलीच्या माहितीचा समावेश असू शकतो.