
Realme चा फ्लॅगशिप स्मार्टफोन Realme GT 2 Pro लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आली आहे. Realme GT 2 Pro भारतात 7 एप्रिल 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता लॉन्च होईल. लॉन्चिंग इव्हेंट realmeच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूट्यूब आणि फेसबुकवरून पाहाता येऊ शकतो.
दरम्यान Realme GT 2 Pro स्मार्टफोन एनव्हायरमेंट फ्रेंडली डिझाइनसह सादर केला जाणार आहे . बाजारातील पहिले बायो-बेस्ड पॉलिमर डिझाइन असेल तसेच हा जगातील पहिला TCO 9.0 सर्टिफिकेशन असलेला फोन असेल. Realme GT 2 Pro स्मार्टफोन पेपर ग्रीन, पेपर व्हाइट या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येईल. फोनवरील आर्टवर्क Muji चे डिझायनर नाओतो फुकासावा ( Naoto Fukasawa) यांनी बनवली आहे.
Realme GT 2 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
Realme GT 2 Pro स्मार्टफोन 6.7-इंचाच्या LTPO AMOLED डिस्प्ले सपोर्टसह येईल. फोन 1440 पिक्सेल आणि 2k रिझोल्यूशन सपोर्ट आणि फोन पंच-होल कॅमेरा कटआउटसह येतो. फोनची पीक ब्राइटनेस 1,400 nits आहे.
Realme GT 2 Pro चा प्रोसेसर
फोनला गोरिल्ला व्हिक्टस प्रोटेक्शन देण्यात आले आहे. Realme GT 2 Pro स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 चिपसेट सपोर्टसह सादर केला जाईल. फोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज दिले जाईल. हा फोन Android 12 वर आधारित Realme UI 3.0 वर चालेल. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोनला 65W फास्ट वायर्ड चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे. फोनला ड्युअल स्पीकरसह डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट मिळेल.
कॅमेरा
Realme GT 2 Pro स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा मुख्य कॅमेरा Sony IMMZ 50 मेगापिक्सेल दिला जाईल. याशिवाय, 50 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल (सॅमसंग जेएन1 सेन्सर) आणि 40x मॅक्रो लेन्स देण्यात आले आहेत.
Realme GT 2 Pro ची अपेक्षित किंमत
Realme GT 2 Pro स्मार्टफोनचा 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज व्हेरिएंट जागतिक स्तरावर 749 युरो (सुमारे 63,300 रुपये) मध्ये सादर केला जाईल. फोनचे 12 जीबी रॅम आणि 267 जीबी स्टोरेज व्हेरिएंट सुमारे 71,800 रुपयांना मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.