

What is Barrier-Free Tolling and How Does It Work?
esakal
देशातील राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला टोल प्लाझावर लागणारी लांब रांग आणि थांबण्याचा त्रास माहिती आहे. पण आता हे दिवस संपणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे की डिसेंबर २०२६ पर्यंत अनेक महामार्गांवर पूर्णपणे अडथळामुक्त टोल प्रणाली सुरू होणार आहे. यामुळे वाहन चालकांना कुठेही थांबावे लागणार नाही. फक्त पुढे जात असताना टोल आपोआप कापला जाईल.