esakal | TALI APP : आता तुमच्या मुलाच्या अभ्यासाची चिंता नाही; खेळता खेळता होईल अभ्यास
sakal

बोलून बातमी शोधा

TALI APP : आता तुमच्या मुलाच्या अभ्यासाची चिंता नाही

TALI APP : आता तुमच्या मुलाच्या अभ्यासाची चिंता नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मुलांचा अभ्यास ही मोठी समस्या आहे. कारण, लहान मुलं अभ्यास करण्यास टाळाटाळ करीत असतात. यामुळे पालकांची डोकेदुखी वाढते. त्यांना आपले काम सांभाळून मुलांकडून अभ्यास करून घेणे कठीण जाते. याचा सर्वाधिक त्रास नोकरी करणाऱ्या पालकांना होतो. नोकरी सांभाळून मुलांचा अभ्यास घेणे कठीण होते. मात्र, आता चिंता करण्याची गरज नाही. कारण, एका ॲपद्वारे तुमचे मुलं सहज अभ्यास करू शकतील. मुलांना समजून घेणे, त्यांची आकलन शक्ती ओळखणे आणि मुलांमधील सर्वोत्तम गुणांना चालना देऊन कौशल्यपूर्ण व्यक्ती म्हणून घडविण्यासाठी ही कंपनी पालकांना मदत करते. (No-more-worrying-about-your-child’s-studies)

कधीकाळी मुलांना सर्वांत चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून धडपड करणे पालकांसाठी एक मोठे आव्हानच होते. यासाठी पालकांना मोठे कष्ट करावे लागत होते. मात्र, बदलत्या काळानुसार यात बदल होत गेला. आता सर्व सोयीसुविधा सहज उपलवब्ध होत आहे. यामुळे मुलांची आवड पाहून पालकांना त्यांना घडवण्याचा प्रयत्न करीत असतात. इंटरनेटच्या युगात सर्व गोष्टींसाठी पालकांना करावी लागणारी धडपड TALI सारख्या नाविन्यपूर्ण सेवेच्या सहायाने सोपी झाली आहे.

हेही वाचा: दुर्दैवी! लहानग्या भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात बहीणही बुडाली

TALI अ‍ॅपने ऑस्ट्रेलियन बाजारपेठेमध्ये धुमाकूळ घातल्यावर भारतात प्रवेश केला आहे. या क्षेत्रातील न्युरोसायन्स संशोधनावरील आपल्या २५ वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवाचा चांगल्या कार्यासाठी वापर करून या असेसमेंट टूलची निर्मिती केली होती. जेणेकरून पालकांना आकलन क्षमतेला तीन श्रेणींमध्ये विभागण्यास मदत होईल आणि त्याद्वारे कोणत्या भागात मुलाला समस्या जाणवत आहे ते ओळखता येईल.

ऑस्ट्रेलियन टेक कंपनी

TALI ही ऑस्ट्रेलियन टेक कंपनी आहे. कंपनी नुकतीच भारतात दाखल झाली आहे. ही कंपनी TALI Assessment नामक अ‍ॅपद्वारे काम करते. हे एक असे साधन आहे जे तुमच्या मुलाचे आकलन कौशल्य आणि गरजा अवघ्या २० मिनिटांमध्ये समजून घेऊ शकते. गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असणारे TALI अ‍ॅप मुलाला आकलन कौशल्या बाबत काही समस्या असल्यास त्याबद्दलचा तपशीलवार अहवाल पालकांना देण्याच्या आणि या प्रवासात प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे.

हेही वाचा: जिवंतपणीच चौकाला दिले ‘अण्णा मोड बस थांबा’ हे नाव; वाचा अण्णाचे कर्म

अ‍ॅप असे करते काम

अ‍ॅपमध्ये सहा आकर्षक खेळरूपी क्रिया आहेत. ज्याद्वारे तुमच्या मुलाच्या कामगिरीच्या आकलन कौशल्याबाबत तीन मुख्य भागात मूल्यमापन केले जाते. ते तीन भाग म्हणजे - निवडक आकलन (एखाद्या गोष्टीवर किती चांगल्या प्रकारे मुलाला लक्ष केंद्रित करता येते), शाश्वत आकलन (किती वेळ मुल चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकते) आणि कार्यकारी आकलन (आपला प्रतिसाद ओळखणे आणि एका कार्यावरून दुसऱ्या कार्यावर लक्ष केंद्रित करणे). या चाचणी नंतर तुम्ही तुमच्या मुलाच्या कामगिरीचा तपशीलवार अहवाल मिळवू शकता आणि त्याचा अर्थ जाणून घेऊ शकता.

(No-more-worrying-about-your-child’s-studies)

संकलन व संपादन - नीलेश डाखोरे

loading image