Noise ची स्वस्तात मस्त स्मार्टवॉच; जाणून घ्या फीचर्स, बॅटरी लाइफ अन् किंमत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

noise colorfit caliber go smartwatch launched in india check pricefeatures

Noise ची स्वस्तात मस्त स्मार्टवॉच; जाणून घ्या फीचर्स, बॅटरी लाइफ अन् किंमत

तुम्‍ही कमी बजेटमध्‍ये पावरफुल स्‍मार्टवॉच खरेदी करण्‍याचा विचार करत असल्‍यास, नॉइजचे नवीन नॉइज कलरफिट कॅलिबर गो (Noise ColorFit Caliber Go) तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते. या स्मार्टवॉचची किंमत 2000 रुपयांपेक्षा कमी आहे. कंपनीचे म्हणणे आहे की कॅलिबर गो ही कलरफिट कॅलिबरचे एक स्ट्रिप डाउन व्हर्जन आहे, जी मागील वर्षी डिसेंबरमध्ये लॉन्च झाली होती. कॅलिबर गो या किंमतीच्या रेंजमध्ये boAt, Xiaomi, Realme सारख्या ब्रँडच्या आधीपासून बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टवॉचशी स्पर्धा करेल. ही स्मार्टवॉच 150 वॉच फेस, 40 स्पोर्ट्स मोडसह दमदार बॅटरी लाईफ देते. या स्‍मार्टवॉचची किंमत किती आहे आणि यामध्ये काय आहे खास आहे, जाणून घेऊया...

खासियत काय आहे?

नॉईज द कलरफिट कॅलिबर गो या स्‍मार्टवॉचमध्ये उजवीकडे फिजिकल बटणासह स्क्वेअर डायल मिळते. यात 1.69-इंचाचा TFT LCD डिस्प्ले दिला आहे ज्याचे रिझोल्यूशन 240x280 पिक्सेल आणि 500 ​​nits पीक ब्राइटनेससह येते. स्मार्टवॉच 150 पेक्षा जास्त वॉच फेससह येते आणि ते वॉटर प्रूफ देखील आहे.

फिटनेस फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास नॉईज कलरफिट कॅलिबर गो हार्ट-रेट मॉनिटर, एक SpO2 सेन्सर, स्लीप आणि स्ट्रेस ट्रॅकरसह सुसज्ज आहे. स्‍मार्टवॉच 40 वर्कआउट मोडला सपोर्ट करते. हे कॅलरी, स्टेप्स आणि अंतर ट्रॅक करण्यास देखील सक्षम आहे.

Nosie ColorFit Caliber Go 300mAh बॅटरी युनिटसह सुसज्ज आहे, जी पूर्ण चार्ज केल्यावर 10 दिवसांपर्यंत घड्याळ वापरता येते असा दावा करते. ही स्‍मार्टवॉच मॅग्नेटीक चार्जिंगद्वारे चार्ज केले जाऊ शकते. स्मार्टवॉच सोशल नोटिफीकेशन्स, अलार्म, कॅलेंडर, वेदर अनेक फीचर्स ऑफर करते.

हेही वाचा: 'हलाल'च्या मुद्द्यावर मनसेतील मतभेद चव्हाट्यावर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

किंमत आणि उपलब्धता

Noise ColourFit Caliber GO जेट ब्लॅक, रोझ पिंक, मिडनाईट ब्लू, ऑलिव्ह ग्रीन आणि मिस्ट ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत 1,499 रुपये आहे आणि ती 3 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून खरेदी करता येईल.

हेही वाचा: Airtel आपली 5G सेवा कधी सुरू करेल? चेअरमन सुनील मित्तल म्हणाले...

Web Title: Noise Colorfit Caliber Go Smartwatch Launched In India Check Pricefeatures

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology