लवकरच येतायत नोकियाचे 4 नवे बजेट स्मार्टफोन्स; पाहा डिटेल्स | Nokia Smartphones | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nokia

लवकरच येतायत नोकियाचे 4 नवे बजेट स्मार्टफोन्स; पाहा डिटेल्स

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

नोकिया मोबाईल कंपनीचे बिझनेस केअरटेकर एचएमडी ग्लोबलने एकापाठोपाठ एक 5जी फोन वेगवेगळ्या मार्केटमध्ये लॉन्च केले आहेत आणि आता कंपनी आणखी चार नवीन फोन बाजारात आणणार असल्याची माहिती समोर येत आहे. अधिकृत रेंडर्ससारखे दिसणारे किमान चार नवीन नोकिया फोन ऑनलाइन लीक झाले आहेत. हे फोन कधी लॉन्च केले जातील आणि ते कोणत्या नावाने ओळखले जातील हे सध्या स्पष्ट झालेले नाही.

टिपस्टर इव्हान ब्लासने ट्विटरवर या कथित नोकिया फोनचे फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी एक N150DL आणि दुसरा स्मार्टफोन हा N1530DL आहे, जे दोन्ही एकाच फोनच्या दोन वेगवेगळ्या व्हेरियंटसारखे दिसतात. नोकियाच्या या दोन फोन मॉडेल्सचे डिझाईन देखील सारखेच आहे परंतु कोणत्याही लेटेस्ट नोकिया स्मार्टफोनपेक्षा हे दोन्ही वेगळे फोन आहेत. यांच्या मागील बाजूस तीन कॅमेरे दिसत असून जे आयताकृती मॉड्यूलमध्ये आहेत. तर डिझाइन हे दोन वर्षांपूर्वीच्या सॅमसंग गॅलेक्सी एम-सिरीज फोनची आठवण करून देते. दोन्ही फोनच्या स्क्रीनवर नॉच आणि बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे LCD असू शकते, त्यामुळे हे फक्त बजेट किंवा मिड रेंज फोन असू शकतात. दोन्हीला 3.5mm हेडफोन जॅक देखील आहे.

हेही वाचा: 'स्क्विड गेम'ची कॉपी विकणाऱ्याला मृत्यूदंड; पाहणाऱ्याला जन्मठेप

Nokia N151DL हा आत्ताच्या सीरीजमधील पुढील फोन आहे. याच्या मागे गोलाकार कॅमेरा दिला आहे, जो सध्याच्या नोकिया फोन्स प्रमाणेच आहे. फोनवर कुठेही फिंगरप्रिंट सेन्सर नाही, याचा अर्थ असा होऊ शकतो की N151DL हा एंट्री-लेव्हल फोन आहे. फोनच्या डिस्प्लेमध्ये खूप जाड नॉच दिलेली आहे. यासोबतच फोनमध्ये 3.5 मिमी हेडफोन जॅक दिला आहे.

चौथा डिवाइस Nokia N152DL सर्वात स्वस्त डिवाइस असू शकतो. त्याच्या मागे एकच कॅमेरा आहे, जो मध्यभागी ठेवला आहे. नोकियाच्या सी-सिरीज फोन्सप्रमाणेच याचे डिझाइन आहे. जर हे खरे असेल तर नोकियाचा हा फोन अँड्रॉइडच्या गो आवृत्तीसह येऊ शकतो. फोनमध्ये जाड बेझल असून नॉच , पंच-होल, फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आलेले नाही, परंतु सेल्फी कॅमेरा आणि मागे स्पीकर दिले आहे.

हेही वाचा: कमी बजेटमध्ये 7 सीटर फॅमिली कार शोधताय? हे आहेत बेस्ट ऑप्शन्स

loading image
go to top